Aurangabad News : औरंगाबाद येथे खास बाब म्हणून महिला कृषी महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज विधान परिषदेत केली. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक (Marathwada) मराठवाडा कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या २ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली होती. (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन अत्यंत सुपीक असून जिल्ह्यात जायकवाडी, शिवना टाकळी, गिरजा, नांदूर- मधमेश्वर असे मोठे प्रकल्प आहेत.
उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या औरंगाबाद परिसरातील मुलींना शेती विषयक ज्ञान उपलब्ध व्हावे व शेती सुधारण्यास पर्यायाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे पहिले कृषी मंत्री म्हणून आपण ठाम भूमिका घ्यावी, व खास बाब म्हणून औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे अशी, आग्रही मागणी सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडली.
या प्रश्नावर उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगितले. मात्र चव्हाण यांचे समाधान झाले नाही. खास बाब म्हणून औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अखेर कृषी मंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी महिलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खास बाब म्हणून एक महिला कृषी महाविद्यालय औरंगाबादेत सुरू करण्याची घोषणा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.