Udgir Assembly Constituency 2024 : उदगीरमध्ये विश्वजीत गायकवाड यांची माघार, बनसोडेंनी मानले आभार

Withdrawal of Vishwajit Gaikwad from Udgir Constituency, Minister Bansode thanked : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचे पालन मी केले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे यासाठी मी माघार घेत आहे. सरकार आणण्यासाठी मी काम करणार आहे.
Udgir Assembly Constituency News
Udgir Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही महिन्यांपासून विश्वजीत गायकवाड उदगीर मतदार संघातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. महायुतीकडून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी एक- एक जागा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सूचनेचा आदर करून विश्वजीत गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दात उदगीरमधील महायुतीचे उमेदवार मंत्री संजय बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले.

उदगीर मतदारसंघात विश्वजीत गायकवाड यांच्यासह भाजपा आणि महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ग्वाही, बनसोडे (BJP) यांनी यावेळी दिली. विश्वजीत गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून जिल्ह्यात महायुतीतील या बंडखोरीची चर्चा सुरू होती. मात्र यावर योग्य मार्ग काढत भाजप व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी गायकवाड यांना माघार घ्यायला लावली. माघारीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय बनसोडे यांनी आगामी काळात प्रचारासाठी विश्वजीत गायकवाड माझ्यासोबत असतील,असा विश्वास व्यक्त केला.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचे पालन मी केले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे यासाठी मी माघार घेत आहे. सरकार आणण्यासाठी मी काम करणार आहे. संजय बनसोडे मतदारसंघातील नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवतील. माझ्याकडून असणाऱ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष व फाउंडेशनच्या माध्यमातून मी सतत संपर्कात राहीन. पक्ष योग्य वेळी,योग्य ठिकाणी मला संधी देईल, असा विश्वास विश्वजीत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

Udgir Assembly Constituency News
Udgir Assembly Constituency 2024 : मंत्री संजय बनसोडेंना धोबीपछाड देण्यासाठी शरद पवार डाव टाकणार

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात ज्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत, ते सगळेच माघार घेतील. त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या मतदारंसघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच थेट सामना होईल, असा दावा निलंगेकर यांनी केला. (Latur) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाकडून विकसित भारत ही संकल्पना राबवली जात आहे. विकासाची ही गंगा महाराष्ट्रात यावी यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची आवश्यकता आहे.

या अनुषंगाने राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत व्हावी, अशी नेतृत्वाची धारणा आहे.यासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून आपले अर्ज मागे घेतले जात असून उदगीर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले विश्वजीत गायकवाड यांनी आपली उमेदवारी बिनशर्त मागे घेतली असल्याचे निलंगेकर म्हणाले.

Udgir Assembly Constituency News
Latur Assembly Constituency: ना गाजावाजा ना चर्चा, भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

विश्वजीत गायकवाड हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी यापूर्वी अनेक वेळा व्यक्त केली. परंतु पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार प्रत्येक वेळी त्यांनी माघार घेतली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी आजही त्यांनी माघार घेतली आहे. ज्या विश्वासाने गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तो विश्वास उदगीरचे आमदार संजय बनसोडे सार्थ ठरवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com