Suresh Dhas On Sandip Kshirsagar : आरोपींसोबतच्या फोटोवरून एखाद्याचे नाव घेणे चुकीचे! सुरेश धस यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांची पाठराखण

Following Dhananjay Munde’s allegations regarding a photo with the accused, Dhas defended Sandeep Kshirsagar, stating it is wrong to name someone solely based on such an image. : मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. ते योग्य पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यांशीही मी बोललो होतो.
MLA Sandip Kshirsagar-Suresh Dhas News
MLA Sandip Kshirsagar-Suresh Dhas NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीडमधील खासगी कोचिंग क्लासच्या मालक आणि शिक्षकाकडून एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर तब्बल वर्षभरापासून लैगिंक अत्याचार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे नाव घेऊन केला. यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपीसोबत फोटो आहे म्हणून एखाद्याचे नाव चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध होते, अनेकांसोबत त्याचे फोटो आहेत. जिल्ह्यातला असा एकही राजकीय पक्ष शिल्लक नाही, की ज्याच्या नेते, पदाधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो नाही. मग सगळ्यांचा संबंध या प्रकरणाशी जोडायचा का? असा सवाल करत धस (Suresh Dhas) यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केली. विधान भवन परिसरात माध्यमाशी बोलताना धस यांनी या प्रकरणाचा तपास बीडचे पोलीस अधीक्षक करत आहेत, धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांचे नाव घेतले हा त्यांचा प्रश्न असल्याचे धस म्हणाले.

बीड शहरातील खासगी कोचिंग क्लासचा संचालक असलेल्या विजय पवार आणि खटावकर नावाच्या एका शिक्षकाने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagr) यांचे या प्रकरणात नाव घेतले गेले. आरोपी विजय पवार आणि खटावकर यांच्या डोक्यावर संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

MLA Sandip Kshirsagar-Suresh Dhas News
Dhananjay Munde : बीड लैगिंक छळ प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! एसआयटी तपासाची केली मागणी

त्यानंतर दोन दिवसांनी आमदार धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागर यांचा विद्यार्थीनीच्या लैगिंक छळ प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप केला. या संदर्भात आमदार सुरेश धस यांना विचारले असता, त्यांनी संदीप क्षीरसागर यांचा या प्रकरणाशी केवळ त्यांचा आरोपी विजय पवार याच्यासोबत फोट असल्यामुळे संबंध जोडणे चुकीचे असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांचे विजय पवार याच्यासोबत फोटो आहे. मग फक्त संदीप क्षीरसागर यांचे नाव का घेतले जात आहे?

MLA Sandip Kshirsagar-Suresh Dhas News
Beed मध्ये विद्यार्थीनीसोबत नको ते कृत्य, आरोपी Sandeep Kshirsagar यांचा समर्थक? Beed Police |

आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. ते योग्य पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकाऱ्यांशीही मी बोललो होतो. ज्या दोन आरोपींचे नाव एफआरआयमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता पुढील कारवाई आणि तपास पोलीस करत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यानूसार धनंजय मुंडे बोलले असतील, असा टोलाही सुरेश धस यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com