Yashpal Bhinge News : ...तेव्हा अशोक चव्हाणांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले यशपाल भिंगे काँग्रेसमध्ये दाखल!

Yashpal Bhinge joined Congress : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Yashpal Binghe
Yashpal Binghesarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभा निवडणूक 2019मध्ये नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले, वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार यशपाल भिंगे यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ते केसीआर यांच्या बीआरएस पक्षात होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यशपाल भिंगे यांनी नागपूर येथील दीक्षा भूमीवर जाऊन अभिवादन केले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2019च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर विजयी झाले होते, त्यांना 486806 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण होते त्यांना 446658 मतं मिळाली होती आणि तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार यशपाल भिंगे हे होते,त्यांनी 161696 मतं मिळवून, अशोक चव्हाणांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yashpal Binghe
Dhairysheel Mohite Patil : माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी; शरद पवार गटाचा दहावा उमेदवार जाहीर

कारण, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्या मतांमधील फरक केवळ 40 हजार 148 एवढाच होता. या लोकसभा निवडणुकीनंतर पुढे यशपाल भिंगे यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता आणि आता ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

नागपूर येथे रविवारी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत यशपाल भिंगे यांच्या नेतृत्वाखाली मुदखेडचे नगराध्यक्ष राज बहादूर कोत्तवर, उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवधे, शिंदे गटाचे नागपूर जिल्हाप्रमुख अमोलभाऊ गुजर, नागपूर शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मनीषाताई बिडकर, अहमदनगरचे घनःशाम शेलार आणि अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Yashpal Binghe
Mohite Patil News : निंबाळकरांना तिकीट मिळाल्यावर घरी बसायची तयारी केली होती; पण... : धैर्यशील यांनी सांगितली उमेदवारीमागची गोष्ट

यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, उपाध्यक्ष संपत म्हस्के, उमेश डांगे, इम्रान शेख आदि उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com