Yogesh Kadam : देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या मदतीवर शिवसेनेचे मंत्री योगेश कदमच नाराज!

Minister Yogesh kadam Criticise Maharashtra Government : मराठवाड्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे दौरे सूरू आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, दत्ता भरणे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आज राहूल गांधी हे देखील मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.
Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada Newssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी कबूल केले की हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी आहे.

  2. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली तरी ती त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यासाठी पर्याप्त नाही.

  3. या कबुलीमुळे सरकारवर मदतीची रक्कम वाढविण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Marathwada Rainfall Affected Farmer : मराठवाड्यात अतिवृष्टी, पूराने थैमान घातले आहे. शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. पीकं, शेती, गुरं-ढोरं, धान्य, संसार सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेले. सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसावं तर ती कधी मिळेल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यावर येण्याआधी मदतीची घोषणा केली असली तरी एकरी साडेआठ हजार रुपयांची मदत ही पुरेशी नसल्याचे स्पष्ट मत त्यांच्या सरकारमधील मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यातील काही गावात जावून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज महसूल राज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली. शेतातील पाणी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहिले आहे. नुकसान मोठे आहे, शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे. सध्या शासनाकडून दिली जाणारी हेक्टरी साडे आठ हजाराची मदत पुरेशी नाही. वाढीव मदत मिळाली पाहिजे, या करिता मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून आपण पाठपुरावा करण्याची ग्वाही कदम यांनी दिली.

आपत्तीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या मराठवाड्यात (Marathwada) सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांचे दौरे सूरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषीमंत्री दत्ता भरणे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आज काँग्रेस नेते राहूल गांधी हे देखील मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. नेत्यांचे दौरे ज्या तुलनेत होत आहे, त्या तुलनेत शेतकऱ्यांना मदत मात्र होताना दिसत नाहीये.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Marathwada floods: नेत्यांचा दौरा, घोषणांचा पाऊस... पण मदत कधी? मराठवाड्यातील पूरग्रस्त हवालदिल!

अशावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा लातूर दौरा महत्वाचा समजला जातो. पण सरकारच्या मदतीवर त्यांनीच नाराजी जाहीर करत घरचा आहेर दिला. हेक्टरी साडेआठ हजारांची मदत पुरेशी नाही, अशी कबुली देतानाच ती वाढवण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे सांगितले. दरम्यान, पूरग्रस्तांना अन्न-धान्याची मदत घेऊन आलेले टेम्पो संतप्त शेतकऱ्यांनी परत पाठवले. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांचा हा दौरा झाला.

Minister Yogesh Kadam Visit Flood Affected Marathwada News
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नुकसानीची पाहणी केली. किती व कशा पद्धतीने नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, याची माहिती घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शासनाकडून जिरायत शेतीसाठी हेक्टरी साडे आठ हजार रुपये तर बागायती शेतीसाठी सतरा हजार रुपये मदत दिली जात आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या व्यतिरिक्त वाढीव मदत देवून शेतकऱ्याना या संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. या करिता प्रयत्न असणार आहेत. अनेक ठिकाणी जमिन खरडून गेली आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे सातबारा घेवून व्यवस्थित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतात पाणी साचून राहिल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात देखील उपाय योजना कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी होत आहे. पण शब्दात अडकण्यापेक्षा शेतकऱ्याना शासन जास्तीची मदत करेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार सकारात्मक आहे, असेही कदम म्हणाले. या संकटाच्या काळात पिक विमा कंपन्यावर लक्ष आहे. त्यांनी काही चुकीचे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे टाळले तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यममंत्र्यांकडे करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

FAQs

प्र.1: योगेश कदम यांनी काय कबूल केले?
उ. त्यांनी सांगितले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत अपुरी आहे.

प्र.2: ही मदत कोणत्या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे?
उ. नुकसानग्रस्त आणि पिकांचे मोठे नुकसान झालेल्या मराठवाडा भागातील शेतकऱ्यांसाठी ही मदत आहे.

प्र.3: शेतकरी मदतीबाबत शेतकऱ्यांची काय भूमिका आहे?
उ. शेतकरी ही मदत अपुरी असल्याचे सांगत आहेत आणि अधिक मदतीची मागणी करत आहेत.

प्र.4: सरकारवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
उ. शेतकरी दबाव वाढवतील आणि मदत वाढविण्याचा विषय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो.

प्र.5: योगेश कदम कोणत्या पदावर आहेत?
उ. ते महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com