High Court : खंडणी प्रकरणात शिंदे गटाच्या युवासेना समन्वयकाला अटकपूर्व जामीन..

Marathwada News : एफआयआरमध्ये नमुद गुन्हे शेलारविरूध्द लागु होत नाही. शेलार यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला.
Aurangabad High Court News
Aurangabad High Court NewsSarkarnama

Aurangabad News : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना शहर जिल्हा समन्वयक दत्ता शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी मंजूर केला आहे. (Aurangabad High Court News) दत्ता शेलार यांच्याविरुध्द अ‍ॅड. सुदर्शन श्रीहरी लोहारे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां‍च्या न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता.

Aurangabad High Court News
Latur District Political : अपर तहसिलचा वाद मुद्यावरून गुद्द्यावर ; याचिकाकर्त्याला धक्काबुक्की अन् धमकी..

त्यात न्यायालयाच्या आदेशाने कलम १५६ (३) अंतर्गत प्रोसेस इश्यु होऊन गुन्हेगारी कट रचने, फसवणूक करुन ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. (Shivsena) दत्ता शेलार यांनी अ‍ॅड. संदीप बी. राजेभोसले यांच्यामार्फत सत्र न्यायालयात (High Court) अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला.

अ‍ॅड. राजेभोसले यांनी युक्तीवाद केला की, सदर गुन्हा दाखल करण्यास एक वर्षाचा विलंब झालेला आहे. फिर्यादीने पोलिस आयुक्त कार्यालयात दिलेल्या तक्रार अर्जामध्ये दत्ता शेलार यांचे नाव नाही. (Aurangabad) फिर्यादी हे वकील असून, त्यांच्याविरुध्द कलम ३७६ भादंविनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी व शह देण्यासाठी त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

परंतु, एफआयआरमध्ये नमुद गुन्हे शेलारविरूध्द लागु होत नाही. शेलार यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला. या अटकपूर्व जामीन अर्जास सरकारतर्फे तसेच, फिर्यादीतर्फे विरोध करण्यात आला. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवादानंतर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अ‍ॅड. राजेभोसले यांना अ‍ॅड. सुधीरकुमार घोंगडे, अ‍ॅड. दिनेश चव्हाण, अ‍ॅड. फरहा शेख, अ‍ॅड. नमिता सरदेशपांडे, प्रशांत गायकवाड, उध्दव दौंड यांनी सहकार्य केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com