Yuvasena : राज्यपालांच्या बुद्धीत सुधारणा व्हावी म्हणून चक्क पोस्टाने बदाम पाठवले..

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांबद्दल अपशब्द वापरून केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा जाणीवपुर्वक अपमान करत आहात. (Yuvasena)
Yuvasena, Aurangabad News
Yuvasena, Aurangabad NewsSarkarnama

औरंगाबाद : `छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श थे`, असे म्हणत अवमानकारक विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलचा संताप काही केल्या कमी होत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई यांच्यासारख्या महापुरूषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधान करून जनतेचा रोष ओढावून घेणाऱ्या राज्यपालांच्या बुद्धीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांना चक्क बदाम पाठवण्यात आले आहेत.

Yuvasena, Aurangabad News
Marathwada : महाविकास आघाडी- शिंदे सरकारचा पुन्हा कस लागणार ? २१५९ ग्रामपंचायतीत कोणाचा झेंडा..

वैजापूर तालुक्यातील युवासेनेच्या (Yuvasena) पदाधिकाऱ्यांनी पोस्टाद्वारे राज्यपालांना बदाम पाठवत संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांना (Bhagat Singh Koshyari) महाराष्ट्रातून परत पाठवा या मागणीसाठी सगळे राजकीय पक्ष एकवटले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्र बंदची हाक सुद्धा देण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे शिवसेना राज्यपालांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत असतांना इकडे युवासेनेने देखील त्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन हाती घेतले आहे.

राज्यपालांच्या बुद्धीमध्ये झालेला भ्रम नाहीसा व्हावा, बुद्धीत सुधारणा व्हावी, यासाठी चक्क पोस्टाद्वारे त्यांना बदाम पाठवण्यात आले आहेत. युवासेनेचे तालुका प्रमुख विठ्ठल डमाळे, उपजिल्हाप्रमुख अक्षय साठे, शहरप्रमुख राहुल साळुंके यांनी या संदर्भातील एक पत्र आणि त्यासोबत बदाम पोस्टाने राज्यपालांच्या राजभवन येथे आज पाठवले आहे.

या पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या बुद्धीत भ्रम झाल्याचे जाणवत आहे. आपण दिवसरात्र राज्याच्या हिताचे काम करत असतांना आपले मानसिक आणि शारिरीक संतुलन खराब होते आहे. आपल्या वर्तणुकीतून ते दिसते आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा काल होता, आजही आहे, भविष्यातही राहणार आणि सुर्य, चंद्र असेपर्यंत राहील.

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांबद्दल अपशब्द वापरून केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा जाणीवपुर्वक अपमान करत आहात. आपल्या बुद्धीत सुधारणा व्हावी यासाठी बदाम पाठवत आहे. यापुढे आपण आपल्या शब्दवाणीमध्ये सुधारणा करावी. जेणेकरून महाराष्ट्रातील महापुरूषांचा आदर कायम राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com