Zilha Parisad News : जिल्ह्याला तीन मंत्री तरी `झेडपी`चा कारभार प्रभारींवर..

Marathwada : पुर्णवेळ अधिकारी लवकर द्यावेत, अशी मागणी शासनाकडे केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
Aurangabad Zilha Parishad CEO News
Aurangabad Zilha Parishad CEO NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्याला एक नाही तर तीन कॅबीनेट मंत्री मिळाले. शिवाय केंद्राचे देखील दोन राज्यमंत्री जिल्ह्यात आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य मिळून पाच मंत्री असलेला हा जिल्हा विकासाच्या बाबतीत वेगवान ठरेल अशी अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारचे तीन मंत्री जिल्ह्यात असतांना मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (Zillha Parisad) जिल्हा परिषदेचा कारभार मात्र प्रभारींच्या भरवशावरच सुरू आहे.

Aurangabad Zilha Parishad CEO News
Sanjay Shirsat On Ministry : मंत्रीपद माझ्या हक्काचे, मी मंत्री होणारच...

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी ही प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेली आहे. (Aurangabad) तसेच जिल्ह्यामध्ये वर्ग दोनच्या अधिकाऱ्याकडे वर्ग एकचा पदभार देऊन कामकाज चालू आहे. (Marathwada) केवळ तीनच पूर्णवेळ गटविकास अधिकारी असून महत्त्वाच्या चार विभागांची जबाबदारी देखील प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, तीन कॅबिनेटमंत्री लाभलेल्या जिल्ह्याच्या (Zillha Parisad) मिनी मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागांसाठी पूर्णवेळ अधिकारी मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी जिल्हा परिषदेतील सोळाहून अधिक विभाग महत्वाची भूमिका बजावत असतात.

मात्र, दुर्दैवाने जिल्हा परिषदेतील चार महत्त्वपूर्ण विभागांना पूर्णवेळ अधिकारीच नाही. हे चारही विभाग प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी, समाज कल्याण व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या चारही विभागांचा समावेश आहे. तर कन्नड, वैजापूर, फुलंब्री व खुलताबाद या तालुक्याला पूर्णवेळ गटविकास अधिकारी आहे, तर उर्वरित तालुक्यावर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांवर सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार सोपवण्यात आला आहे.

त्यामुळे हे अधिकारी त्यांच्या विभागाचा कारभार सांभाळून अतिरिक्त विभागाला खरचं न्याय देवू शकत असतील का? असा प्रश्न आहे. दरम्यान या विभागांना पुर्णवेळ अधिकारी लवकर द्यावेत, अशी मागणी शासनाकडे केली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले. राज्यात रोजगार हमी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी मंत्री संदीपान भुमरे तर कृषी खात्याची जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे.

Aurangabad Zilha Parishad CEO News
Sharad Pawar resignation : अजित पवारांना राजीनाम्याची पूर्वकल्पना होती!

तर सहकारमंत्री अतुल सावे असे तीन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याला लाभले आहेत. त्यांच्याच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एमआरजीएस, कृषी, समाज कल्याण विभागालाही अद्याप पूर्ण वेळ अधिकारी नाहीत. याशिवाय जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे पद असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर गेल्या सहा महिन्यापासून प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांना पूर्णवेळ गटविकास अधिकारी नाही. तर कन्नडच्या बीडीओला छत्रपती संभाजीनगरचा अतिरिक्त पदभार, सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याला सिल्लोड, गंगापूर तालुक्याचे बीडिओ पद, कृषी अधिकाऱ्याला वैजापूर बीडिओचे पद तर पैठण येथे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याला बीडिओचा पदभार दिलेला आहे. तसेच जिल्ह्यात दोन विस्तार अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com