Sanjay Shirsat On Ministry : मंत्रीपद माझ्या हक्काचे, मी मंत्री होणारच...

Marathwada : सत्तेसाठी कोणीही काही करायला तयार आहे, मी कोणाचा लाचार नाही कारण मी तर माझ्या हक्काचे मागतोय.
Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Shivsena : राज्यातील सत्तांतरांवर गंडांतराचे सावट आहे, सर्वोच्च न्यायलायचा निकाल कुणाच्या बाजुने लागतो, १६ आमदारांचे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतांना शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मात्र आपण मंत्री होणारच असा दावा केला आहे.

Mla Sanjay Shirsat News, Aurangabad
Sanjay Shirsat On Sharad Pawar : पवारांनी राजीनाम्याची गुगली टाकत अनेकांचा `करेक्ट कार्यक्रम` केला..

`मी कधीच कोणत्या गोष्टीसाठी कमी पडलेलो नाही, मी सर्वांना तातडीने उत्तर देतो. (Shivsena) मनुष्य हा कर्तृत्वाने मोठा होतो, आणि मी कुणाचा लाचार नाही, मी माझ्या हक्काचे मागत आहे, मी मंत्री होणारच`, असे (Sanjay Shirsat) शिरसाट म्हणाले. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरसाट उपस्थित होते. मी धर्माच्या बाहेर गेलेलो नाही. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे इथपर्यंत आलो आहे. (Marathwada) बाबासाहेबांचे विचाराचे पालन करण्यासाठी मी कधीच कमी पडत नाही व पडणारी नाही. माणसाच्या कर्तृत्वाने तो मोठा असतो आणि ते मी सर्वांना दाखवून देईल.

सत्तेसाठी कोणीही काही करायला तयार आहे, मी कोणाचा लाचार नाही कारण मी तर माझ्या हक्काचे मागतोय. `मी मंत्री होणार`,च असे शिरसाट यांनी छातीठोकपणे सांगितले. डॉ.बाबासाहेब हे अद्याप कोणाला पूर्णपणे कळालेले नाही, जेव्हा ते कळतील तेव्हा त्यांची खरी प्रगती होईल. विज्ञानवादी असलेल्या बुद्ध तत्त्वज्ञानाचा बाबासाहेबांनी स्वीकार केला. हे विचार आपण पुढे न्यायला हवे, असे आवाहनही शिरसाट यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com