Parbhani ZP Election : पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाहीत! आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात महादेव जानकरांचा एल्गार

Zilla Parishad Elections Mahadev Jankar : रत्नाकर गुट्टेच नाही तर माझ्या पक्षाचे चार आमदार भाजपाने फोडले आहेत. राहुल कुल, बाबासाहेब पाटील हे माझेच आमदार होते, असे जानकर म्हणाले
Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Ratnakar Gutte, Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

RSP News : जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेसची युती झाली आहे. आम्ही परभणी जिल्ह्यातील बहुतांश गटात उमेदवार दिले आहेत. माझे पक्षाचे चार आमदार भाजपाने फोडले. गंगाखेडच्या रत्नाकर गुट्टे यांचाही त्यात समावेश आहे. पण मतदारांनी साथ दिली, तर पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाहीत, याची काळजी मी घेईन, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी गंगाखेडमधूनच दिला.

जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस सोबत युती केल्यानंतर रासपचे महादेव जानकर गंगाखेडमध्ये आले होते. त्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा होणार आहेत. भाजपाची साथ सोडल्यानंतर काँग्रेससोबत युती करत महादेव जानकर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत.

गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे भाजप सोबत आहेत, याकडे जानकर यांचे लक्ष वेधले असता गुट्टेच नाही तर माझ्या पक्षाचे चार आमदार भाजपाने फोडले आहेत. राहुल कुल, बाबासाहेब पाटील हे माझेच आमदार होते.

परभणीच्या मतदारांनी माझ्यावर खूप प्रेम केले. लोकसभेला पंधरा दिवसात मला पाच लाखाहून अधिक मते मिळाली. रत्नाकर गुट्टे हे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. पण काही लोक चुकीचे निघतात, त्याला काय करणार? पण जिल्हा परिषदेत मला तुम्ही लोकांनी साथ दिली, तर पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाही याची काळजी मी घेईन, असा इशारा जानकर यांनी दिला.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Ajit Pawar successor : ‘अजितदादांचा उत्तराधिकारी नेमण्याची काहींना खूप घाई झालीय; पण आज वेळ पवार कुटुंबांसोबत उभं राहण्याची’

भाजपाचे मालक मोदी, शहा, फडणवीस..

परभणीच्या पालकमंत्री भाजपचे एबी फाॅर्म घेऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे गेल्या होत्या. यावर पालकमंत्री या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना कुठलेही अधिकार नाही. भाजप हा आता जगातला, त्याही पलीकडचा पक्ष झाला आहे. मोदी, शहा, फडणवीस, गडकरी हे या पक्षाचे मालक आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांना दोष देऊन काही अर्थ नाही, असा टोलाही जानकर यांनी यावेळी लगावला.

मी स्वत: तिकीटं वाटतो...

भाजपामधील अनेक नेत्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. पंकजा मुंडे यांना बहिण मानतो, पण त्यांच्या माझ्याच विरोधात सभा होत आहेत. त्यांनीही हीच भूमिका मांडली की त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि आमचा वेगळा. वैयक्तिक संबंध आणि राजकारण आपापल्या ठिकाणी असते. माझा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना आता दुसर्‍यांकडे तिकिटासाठी हात पसरावे लागत आहेत. मी स्वत: तिकीटं वाटतो असंही जानकर म्हणाले.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
KDMC Mayor Election : कल्याण-डोंबिवलीचे महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हर्षाली थविल यांनी दाखल केला अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com