वडिलांनंतर मुलाचा नंबर? नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेना आग्रही

Santosh Parab half murder case : मुख्य सुत्रधार म्हणून नितेश राणेंचे नाव घेण्यात आले आहे.
nitesh rane may arrested in Santosh Parab half murder case

nitesh rane may arrested in Santosh Parab half murder case

Sarkarnama

कणकवली : मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक झाली होती. त्यानंतर आता त्यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात (Sindhudurg District Bank Election) १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Santosh Parab half murder case) झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी सलग दोन दिवस नितेश राणेंची पोलिस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली होती.

त्यानंतर आता शिवसेना देखील आमदार नितेश राणे यांच्या अटकेसाठी आग्रही झाली आहे. राणे यांचे राजकीय विरोधक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला (Santosh Parab half murder case) जबाबदार असलेल्या लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पण मुख्य सुत्रधारापर्यंत पोलिस पोहचत नाहीत. यात मुख्य सुत्रधार म्हणून नितेश राणेंचे (Nitesh Rane) नाव घेण्यात आले आहे. त्यांना दोन वेळा पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलावून चौकशी केली, पण स्टेटमेंट घेवून त्यांना सोडून देण्यात आले.

<div class="paragraphs"><p>nitesh rane may arrested in&nbsp;Santosh Parab half murder case</p></div>
अजित पवारांनी राज्यपालांना करुन दिली परंपरेची आठवण...

मात्र नितेश राणे यांच्यावर कोणताही दबावात न येता पोलिसांनी कारवाई करावी, ते भाजपचे आमदार आहेत किंवा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना वेगळा न्याय पोलिसांनी देऊ नये अन्यथा शिवसेना कणकवलीत आंदोलन करेल असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे. तसेच आपण उद्याच या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये जावून त्यांच्या अटकेची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>nitesh rane may arrested in&nbsp;Santosh Parab half murder case</p></div>
राज्यपालांनी असे उत्तर दिले की महाविकास आघाडीचे नेते चाट पडले...

मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुतेला अटक

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख म्हणू संतोष परब काम पाहत होते. कणकवली रेल्वे स्थानकालगत नरडवे रस्त्यावर शनिवारी (ता. १८ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास संतोष परब यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यानंतर संशयित मोटारचालकाला फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी आज या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुतेलाही (Sachin Satpute) दिल्लीतून अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com