Girish Mahajan: संकटमोचक गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या मदतीला धावले! वर्षभराचा पगार देणारे पहिलेच मंत्री ठरले

Girish Mahajan donates ₹31 lakh full year’s salary to CM Relief Fund:गिरीश महाजन यांनी वर्षभराचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाजन यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अन्य लोकप्रतिनिधींनाही असेच योगदान देण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.
Girish Mahajan donates ₹31 lakh full year’s salary to CM Relief Fund
Girish Mahajan donates ₹31 lakh full year’s salary to CM Relief FundSarkarnama
Published on
Updated on

मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे.यासाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपले वर्षभराचे वेतन ( रक्कम रुपये ३१ लाख १८ हजार २८६ ) मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत.

वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणारे महाजन हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महाजन यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि इतर लोकप्रतिनिधींनाही असेच योगदान देण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर महाजन यांनी या रकमेचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन हे पुरग्रस्तासाठीही संकटमोचक ठरले आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्या पासून डिसेबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीचे संपूर्ण वेतन 31 हजार 18 हजार 286 रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे.

मराठवाड्यातील जालना,बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, या जिल्ह्यांमध्ये नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या गिरीश महाजन यांनी भेटी घेऊन भागाची पाहणी केली आहे.

Girish Mahajan donates ₹31 lakh full year’s salary to CM Relief Fund
Maharashtra Government: तुकडे बंदी कायदा रद्द; 49 लाख जमिनींच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित होणार

राज्यात मुसळधार पाऊस, महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सरकारकडून त्यांना योग्य ती मदत मिळत असताना आपला देखील त्यामध्ये सहभाग असावा म्हणून माझ्या सद्याच्या मंत्री पदाच्या वर्षे भराचे एकूण पगार मी मुख्यमंत्री सहायता निधीस दिला असल्याचे महाजन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com