Sudhir Mungantiwar : मंत्रिपद हुकले, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत गाणं गायलं, नितीन गडकरींची काढली आठवण!

Sudhir Mungantiwar Sings Bollywood Song in Assembly : महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा मंत्रिपद मिळण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या क्षणी मुनंगटीवार यांचे नाव मंत्रि‍पदाच्या यादीतून वगळण्यात आले.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar sarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar News : विधानसभेच्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये सुधीर मुनंगटीवार हे सातत्याने चर्चेत आहेत. सरकारच्या काही बाबींवर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी (ता.12) आपल्या मनातील खंत व्यक्त करताना हिंदी सिनेमातील गाणं म्हणून दाखवलं.

मुनगंटीवार म्हणाले, 'मला काही गोष्टींची खंत देखील आहे. अध्यक्षमहाराज खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होती. मी काही बोललो तर टिव्ही चॅनेलवाले बोलतात घरचा आहेर. आज काल पत्रिकेत आहेर आणू नये, आहिरे स्वीकारणार नाही, असे लिहून येते. मी काही बोललो तर मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे, असे बोललं जातं.'

Sudhir Mungantiwar
Malhar certification : जेजुरीचा राणेंना झटका की समर्थन? 'मल्हार' नावावरून वाद पेटला! संस्थानच्या दोन भूमिका समोर

'आमचे नेते त्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरी. ते नेहमीचं एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात. तुझसे नाराज नहीं जिन्दगी हैरान हू मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हू मैं!कधी कधी पत्रकार विचारतात तुम्ही नाराज आहे का? तेव्हा तुमसे मासूम सवालोंसे परेशना हू मैं' असे मुनंगटीवार यांनी म्हटले.

'शेवटी या सभागृहात आम्ही कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही. निवडणूक जिंकणं हे आमचं लक्ष नाही. आमच्या मतदारसंघातील शोषित, दुर्बल, दिन, अपंग, असहाय्याचं मन जिंकण्यासाठी आम्ही येथे मुद्दे मांडतो.', असे ठासून सांगत आपण मंत्रि‍पदामुळे नाराज नसल्याचे मुनंगटीवार यांनी सांगितले.

शेवटच्या क्षणी मंत्रिपद नाकारले?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा मंत्रिपद मिळण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांच्या मंत्रि‍पदासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. दिल्लीत मंत्र्यांच्या नावाची जी यादी पाठवले होती त्यामध्ये मुनगंटीवार यांचे देखील नाव होते. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मुनंगटीवार यांच्या नावाला रेड सिग्नल दिल्याने शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मंत्रि‍पदाच्या यादीतून वगळ्याची चर्चा आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Sudhir Mungantiwar
Hasan Mushrif News : वैद्यकीय विद्यार्थी चिंतेत अन् मंत्री हसन मुश्रीफ मात्र निश्चिंत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com