Eknath Shinde : मिशन 'BMC': एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना 'कानमंत्र'; 'मेहनत करा, महापौर आपलाच!'

Mumbai Mayor Election News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे. तोंडावर आलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली असून त्यासाठी आतापासूनच जोर लावला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. येत्या काळात मेहनत करा, महापौर आपलाच असेल असे स्पष्ट करतानाच येत्या काळात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यकर्त्यांना सर्व मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) या निवडणुकीची तयारी जॊरात सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 50 हुन अधिक माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. त्यामुळे सध्या एकीकडे जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेसाठी महायुती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Eknath Shinde
BJP News: विधानसभेनंतर भाजपनं निवडणुकीचा पॅटर्न बदलला! कार्यकर्त्यांना दिलं नवं 'टार्गेट',चव्हाणांची फडणवीसांच्या 'होमग्राऊंड'मधूनच मोठी घोषणा

येत्या काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांना सर्व मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'राजकारण वाटत असेल तर वाटू द्या आम्ही...'

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, येत्या काळात मेहनत केली तर यंदाचा महापौर आपलाच असेल. त्यांनी पदाधिकाऱ्यांना आपापसातील हेवेदावे आणि वादविवाद बाजूला ठेवून कामाला लागण्यास सांगितले. ही निवडणूक ‘महायुती’ म्हणून लढवली जाईल आणि विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde
Jayant Patil statement: : राज्यातील राजकारण तापणार; विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत माजी मंत्री जयंत पाटलांनी केले मोठे विधान

कार्यकर्त्यांनी निवडणूक मतदार यादीवर काम करावे आणि प्रत्येक वॉर्डातील वाढीव मतदारांची माहिती संकलित करावी, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. शिंदे यांच्या या आवाहनामुळे मुंबई मनपा निवडणुकीसाठी महायुती सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde
BJP Politics : पडळकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी नगरसेवकाने चंद्रकांत पाटलांसमोरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com