MLA Bachchu Kadu : गुवाहाटीला जाण्यापूर्वी ठाकरे यांना बच्चू कडूंचा फोन; काय होती मानसिकता...

Bacchu Kadu Big Revealation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवेसनासह अपक्ष आमदारांना घेऊन गेले. गुवाहाटीला जाण्याअगोदर उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यांना शिवसेनेतील बंडाची पूर्ण कल्पना होती, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

MLA Bachchu Kadu News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील (Shiv Sena) बंड आणि गुवाहाटीचा प्रवास राज्याच्या राजकारणाचा इतिहास आहे. हा इतिहास कोठून ना कोठून डोकावणारच! गुवाहाटीच्या प्रवासावर आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी पुन्हा भाष्य केले आहे. गुवाहाटाली जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपण फोन केला होता, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. आमदार कडू यांच्या या माहितीमुळे गुवाहाटीतील आठवणी ताज्या झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील बंड अजूनही संशोधनाचा विषय आहे. शिवसेनेसह अपक्ष, असे एकूण 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. त्यावेळी काय झाले? कोण कोणत्या भूमिकेत होता? बंडामागील कारणे कोण कोणती आहेत? यावर भाष्य होत असते. 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीवर भाष्य केले आहे. गुवाहाटीला जाण्याअगोदर मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील बंडाची पूर्ण कल्पना होती, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu Kadu
Chandrakant Khaire News : शांतीगिरी महाराजांचा पराभव केला अन् खैरेंना मिळाले नवे नाव...

बच्चू कडू म्हणाले, "गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांना फोनवरून संपर्क साधला होता. त्यांना शिवसेनेतील बंडाविषयी पूर्ण कल्पना होती. त्यांनी फोन उचलला. ते बोलले देखील. मात्र ते बोलण्याची मनस्थितीत नव्हते. थोडेसे बोलले आणि त्यांनी फोन ठेवून दिला". Before going to Guwahati Uddhav Thackeray was called by MLA Bachchu Kadu

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संबंधावर देखील आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले. "उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे काही भांडण नाही. राजकीय भांडण नाही. गेल्या पाच वर्षात एक गोष्ट राजकारणात घडली. ती म्हणजे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सर्वांच्या बॅनरवर आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर देखील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसला. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो. हे कित्येक काळापासून चालत आले आहे. शिवाजी महाराज, रामायण किंवा महाभारत पाहा, यात राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नाही. त्यामुळे जनसामान्यांनी राजकारण मनावर घेऊ नये. मतदानावेळी आपल्यासाठी कोण काम करतो आहे, हे मतदारांनी पाहिले पाहिजे. कोण कोठे आहे, हे पाहात बसू नये", असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

Bachchu Kadu
Ravikant Tupkar News : 'दलित, मुस्लिम मतं महाविकास आघाडीला, महायुती तिसऱ्या स्थानावर', शेतकरी नेत्याने वर्तवले भाकीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com