Bharatshet Gogawale News: दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेतील आनंदराव अडसूळ , हेमंत पाटील, संजय शिरसाट यांना महामंडळांच्या अध्यक्षपदी नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावेळी मंत्रिपदाच्या अपेक्षेत असलेल्या भरत गोगावले यांचे नाव नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर भरत गोगवले यांना मंत्रिपदाचा दर्जा देत त्यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद हे परिवहन मंत्र्यांकडे देण्यात येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गोगावले यांच्या नावाची शिफारस एसटी महामंडळाचे अध्यक्षपदासाठी करण्यात आल्याची माहिती आहे.
आपली मंत्रिपदाची अपेक्ष भरत गोगावले यांनी कधीच लपवून ठेवली नाही. आपण मंत्रिपदासाठी कोट देखील शिवून ठेवल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र, अजित पवार गटाची महायुतीत एंट्री झाल्याने गोगावले यांनी मंत्रिपदाची संधी हुकली होती. मात्र, गोगावलेंनी एकनाथ शिंदे आपल्याला न्याय देतील ही भूमिका घेतली होती.
नुकत्याच महामंडाळाच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या शिंदे गटाकडून तीन नेत्यांनी मोठी जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महामंडळावर आत्तापर्यंत तीन नियुक्त्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे नियुक्ती झालेले तीनही नेते शिंदे गटाचे आहेत. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी देखील भरत गोगावले यांच्या नाव चर्चेत आहे. त्यामुळे अजित पवार गटावर अन्याय होत असल्याची भावना काही नेत्यांमध्ये आहे. अजित पवार यांच्यासोबत आमदारांच्या झालेल्या बैठकीत महामंडळाच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती आमदारांनी अजित पवारांना केल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.