MLA Bhaskar Jadhav : `नारायणराव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ नही`.. भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली..

SHIVSENA UBT-BJP controversy : केंद्र सरकार जे पैसे वाटत आहे ते स्वतःच्या फंडातून देत नाही. जनतेने कराच्या रूपात देशाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशातून देत असते. बिहार, आंध्र प्रदेश राज्याला वेगळे पॅकेज दिले जाते, हा दुजाभाव कशासाठी?
MP Narayan Rane-MLA Bhaskar Jadhav
MP Narayan Rane-MLA Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

MP Narayan Rane News : माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतेच भाजपने राज्यातील विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात, असे विधान केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवतांना माझे राणेंशी याबबतीत एकमत असल्याचा टोला लगावला.

नारायण राणे यांच्याशी माझं कधी एकमत होत नाही, पण भाजपने विधानसभेच्या सगळ्या जागा लढण्याबाबत त्यांनी केलेल्या विधानाशी मी सहमत आहे. राणे आणि त्यांच्या पक्षात हिंमत असेल तर 288 जागा लढवून दाखवाच, असे आव्हान देतानाचा नारायण राणे (Narayan Rane) आगे बढो, हम तुम्हारे साथ नही, असा चिमटा काढला.

माध्यमाशी बोलताना जाधव यांनी नारायण राणे यांच्यासह विविध विषयावर महायुतीवर टीका केली. महाराष्ट्राने तुमचा अहंकार मातीमोल केला, गर्व हरण केले, चारशे पारचा दावा करणाऱ्या तुम्हाला इस बार उद्धव ठाकरे यांनी तडीपार केले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राला पैसे देणार नाही का? असा सवाल करत भास्कर जाधव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

MP Narayan Rane-MLA Bhaskar Jadhav
Ratnagiri News : भास्कर जाधव सुरतपर्यंत गेले होते..! रामदास कदमांचा पुन्हा गौप्यस्फोट

अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा अपमान..

गेल्या वर्षी नीती आयोगाच्या बैठीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना तिसऱ्या रांगेत बसवले होते. अर्थसंकल्पात राज्याचे स्थान शेवटून तिसरेही नाही, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा अपमान केला आहे. निती आयोगाच्या बैठकीनंतर महाराष्ट्राला अर्थसंकल्पात खूप काही मिळेल, अशा बातम्या पेरल्या गेल्या राज्याच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी टीका भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली.

केंद्र सरकार जे पैसे वाटत आहे ते स्वतःच्या फंडातून देत नाही. जनतेने कराच्या रूपात देशाच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशातून देत असते. बिहार, आंध्र प्रदेश राज्याला वेगळे पॅकेज दिले जाते, हा दुजाभाव कशासाठी? महाराष्ट्राने तुमचा अहंकार मातीमोल केला, गर्व हरण केले. तुमच्या चारशे पारच्या आशा उद्धव ठाकरे यांनी धुळीस मिळवत तुम्हाला तडीपार केले त्यामुळे राज्याच्या हक्काचा वाटा देणार नाही का?

MP Narayan Rane-MLA Bhaskar Jadhav
BJP Vs Shivsena : 'संजय राऊतांसाठी मजबुरी का नाम उद्धव ठाकरे आणि फडणवीस खलनायक...'; भाजप नेत्याचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत..

राज्यावर सूड उगवणार का? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. येणाऱ्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात आम्ही सरकार आणू, असा दावा जाधव यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा उद्धव ठाकरेच हवेत, अशी माझी नेता म्हणून इच्छा आहे.

रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीची, जनतेची सुद्धा तशीच इच्छा, असल्याचे जाधव म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जाधव यांनी टीका केली. आज राज्याचे गृहमंत्री आपल्यावर असलेली जबाबदारी पार न पाडता, पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी ठोकून काढा, असे म्हणतात.

MP Narayan Rane-MLA Bhaskar Jadhav
Balasaheb Thackeray News: नारायण राणे, छगन भुजबळांचे पक्ष वेगळे तरी बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा कायम

गृहमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठोकून काढा, असे सांगणे लांच्छनास्पद आहे. अजितदादा पवार आपल्या आमदारांना अधिकचा निधी देऊन राज्यात नवा पायंडा पाडत आहेत. या दोन्ही नेत्यांचे राज्याकडे लक्ष नाही. यांचे लक्ष फक्त दुसऱ्याचे सरकार आणि आमदार कसे फोडायचे यावरच असल्याचा टोला जाधव यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com