Rohit Pawar On Uday Samant : 'उद्योगमंत्री नेमके कोणते 'उद्योग' करता?'; सामंतांना आमदार पवारांचा सवाल

Hinjewadi IT Company : पुण्यातील उद्योग स्थलांतरीत होत असल्याच्या मुद्यावर आमदार रोहित पवार यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांना बोचरा सवाल केला आहे.
Rohit Pawar Uday Samant
Rohit Pawar Uday Samantsarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar : पुण्यातील हिंजवडीमधील 37 कंपन्या बाहेर स्थलांतरीत झाल्यावरून आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्र्यांच्या उद्योगांविषयी संताप व्यक्त केला. उद्योगमंत्र्यांना याची माहिती नसेल तर, हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? असा सवाल केला आहे. या बोचऱ्या प्रश्नावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार पवारांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुण्यातील हिंजवडीमधील स्थलांतरीत झालेल्या 37 उद्योगांवर नाराजी व्यक्त केली. याबाबत ट्विट करत उद्योग मंत्र्यांचा नेमका कोणता उद्योग चालू आहे, असा बोचरा प्रश्न केला आहे. शरद पवार साहेबांनी हिंजवडी आयटी पार्क उभं करून देशभरातील लाखो युवकांना लाखो रुपयांच्या पॅकेजची सोय पुण्यात केली होती.

पण आज इथल्या तब्बल 37 कंपन्या आपली पॅकिंग करून बाहेर गेल्या तरी, उद्योगमंत्र्यांना याची माहिती नाही, मग हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? 'विचारां'साठी आणि 'विकासा'साठी काम करतो म्हणणाऱ्या या सरकारचा हाच का विचार आणि विकास? असा प्रश्नही आमदार रोहित पवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे (Pune) हिंजवडीमध्ये 139 कंपन्या आहेत. त्यात 2 लाख 17 हजारांच्या आसपास मनुष्यबळ काम करते. परंतु गेल्या दहा वर्षात 37 कंपन्या येथून स्थलांतरीत झाल्या आहेत. 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या इथल्या आयटीपार्कमध्ये आता मुलभूत सुविधा कमी पडू लागल्या आहेत. पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. रस्ते अपुरे पडू लागलेत. या परिस्थितीमुळे कंपन्या जाऊ लागल्या आहेत. वाहतूककोंडी वाढल्याने आयटी कंपन्या येथून स्थलांतरीत होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम थेट रोजगारावर झाला आहे.

Rohit Pawar Uday Samant
MLA Rohit Pawar : मनुस्मृतीची होळी करण्याची हिंमत दाखवणार का?; आमदार पवारांनी भाजपला घेतलं अंगावर

आयटी पार्कमधून कंपन्या स्थलांतरीत होऊ लागल्याने राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी आणि आमदारांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवार यांनी उद्योगमंत्र्यांवर टीका केली आहे.

Rohit Pawar Uday Samant
MLA Ram Shinde :'मला स्थानबद्ध केले होते'; आमदार राम शिंदेंनी 2022 जयंतीची आठवण सांगितली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com