MLA Ram Shinde :'मला स्थानबद्ध केले होते'; आमदार राम शिंदेंनी 2022 जयंतीची आठवण सांगितली!

Punyashlok Ahilya Devi Holkar Festival : 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते. त्यावेळी 31 मे 2022 चा जयंती महोत्सव मी घरात केला. अहिल्यादेवींची माझ्यावर कृपा असल्याने लगेच वीस दिवसात वरिष्ठ सभागृहात गेल्याचे भाजप प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
Ram Shinde, Rohit Pawar
Ram Shinde, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव (Punyashlok Ahilya Devi Holkar Tricentenary Jubilee Festival) वर्षाला येत्या 31 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यांचे जन्मस्थळ असलेले चौंडी (ता. जामखेड) गाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला बोलावलेही नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. पण आम्ही आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले", अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी येथे दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Shinde, Rohit Pawar
Milk Subsidy : मोठा दिलासा, 91 हजार दूध उत्पादकांना 76 कोटींचे अनुदान...

आमदार शिंदे म्हणाले, "चौंडी हे माझे गाव आहे. अहिल्यादेवींचे माहेर असलेल्या शिंदे परिवाराचा मी घटक आहे. दोन वेळा गावचा सरपंच, दोन वेळा आमदार व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम केले आहे. मात्र, 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला बोलावलेही नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. त्यावेळी 31 मे 2022 चा जयंती महोत्सव मी घरात केला".

अहिल्यादेवींची माझ्यावर कृपा असल्याने लगेच 7 जून 2022 ला राज्याच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचण्यासाठी मला तिकीट मिळाले व वीस दिवसात मी आमदारही झालो. मात्र, आम्ही जयंती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणाचेही नाव टाळले नाही. रोहित पवार यांचे नाव आम्ही टाकले, असे सूचक भाष्यही आमदार शिंदे यांनी केले. MLA Ram Shinde informed that MLA Rohit Pawars name has been included in the Punyashlok Ahilya Devi Holkar Tricentenary Jubilee Festival pamphlet

मी निधीची सुरूवात केली : आमदार शिंदे

1995 पूर्वी चौंडी या गावाला जायला रस्ता नव्हता. हे दुर्लक्षित तीर्थक्षेत्र होते. 1995 मध्ये युती सरकार आल्यावर तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी सर्वांचे लक्ष चोंडीकडे वेधले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना चौंडीला आणले. त्यावेळी चोंडी विकासासाठी दोन कोटीचा निधी मिळाला. तेव्हापासून तो निधी पुढेही येत गेला. पण 1999 ते 2008 पर्यंत, असा विकास निधी आलाच नाही. 2008 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी चौंडीच्या शिल्पसृष्टीसाठी 80 लाखाचा निधी दिला. त्यानंतर मी मंत्री झाल्यावर चौंडीतील विकास कामांचा निधी नियमितपणे सुरू झाला व त्यानंतर चौंडीच्या विकासाला गती मिळाली, असा दावाही आमदार प्रा. राम शिंदे यांनी केला.

Ram Shinde, Rohit Pawar
Drought Fund Corruption : दुष्काळनिधी घोटाळ्याप्रकरणी पडळकर आक्रमक; ‘सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com