Congress Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याची शंका असलेल्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याने काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोडके यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रे निमित्त अमरावतीमध्ये उद्या (रविवारी) येणार आहेत. त्यावेळी आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर सुलभा खोडके यांची त्यांच्या पक्षासोबत सलगी वाढली होती. विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसच्या पाच ते सहा आमदारांनी क्राॅस व्होटींग केले. क्राॅस व्होटींग करणाऱ्यांमध्ये सुलभा खोडके यांचा देखील समावेश असल्याची चर्चा होती.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारामध्ये देखील सुलभा खोडके या सक्रिय दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांची महायुतीसोबत सलगी वाढल्याची चर्चा होती.
सुलभा खोडके या उद्या (रविवारी) अमरावतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभेला त्याच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.