MNS News : मनसेच्या बड्या नेत्याची रामदास आठवलेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘काचेच्या घरात आहोत…’

Political News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आठवले यांच्या या टीकेला आता मनसेकडून त्याच शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले.
Ramdas Athwale
Ramdas AthwaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सत्तादेखील स्थापन झाली आहे. सत्तास्थापन झाली असली तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आठवले यांच्या या टीकेला आता मनसेकडून त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून आठलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे. (MNS News)

विधानसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

Ramdas Athwale
Sharad Pawar: मारकडवाडीत शरद पवार कडाडले, 'बॅलेटवर मतदान घ्या, निवडणूक पद्धत बदला' VIDEO पाहा

या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले, ' राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आम्ही महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार करू. आमचे हिंदुत्वाचे विचार एकच आहेत, रामदास आठवले तुमचा पूर्ण आदर बाळगून एवढंच सांगू इच्छितो की, गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले. तुम्ही त्या झाडावर चढला आणि आता भाजपच्या झाडाचे बांडगुळ आहात.

तुमच्यामुळे भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळे तुम्ही अखंड मंत्री पदावर आहात. ते तुम्ही लक्षात घ्यावे, दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत, याचा त्यांनी विचार करावा. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो कारण त्यांनी माझ्या नेत्यावर आरोप केले आहेत.

Ramdas Athwale
Sharad Pawar: मारकडवाडीत शरद पवार कडाडले, 'बॅलेटवर मतदान घ्या, निवडणूक पद्धत बदला' VIDEO पाहा

राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असे आठवले यांनी म्हटले होते. त्यांनी केलेली ही टीका मनसे नेत्याच्या जिव्हारी लागली होती.

दरम्यान, नाशिकमधील कार्यक्रमप्रसंगी बोलताना आठवले यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला होता. लोकसभेत अपयश आले, विधानसभेत यश आले, आरक्षण जाणार असे सांगणाऱ्याला जनतेने धडा शिकवला, असेही यावेळी आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athwale
Bjp News : 'होऊन जाऊ द्या,बॅलेट पेपरवर निवडणुका'; भाजपच्या 'या' नेत्याने थेट विरोधकांना दिले आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com