Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महिला दिनाला खास फेसबुक पोस्ट; केलं 'हे' आवाहन

International Women's Day 2023 : ...हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.
Mns Chief Raj Thackeray News
Mns Chief Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Facebook Post : जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर ठाकरे यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी समस्त महिला वर्गाला आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या फेसबुक पोस्टमध्ये महिलांविषयी कौतुकोद्गार काढले आहेत. यावेळी त्यांनी आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. तसेच जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे असं म्हटलं आहे.

Mns Chief Raj Thackeray News
Prakash Solanke News : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके अडचणीत,पत्नीसह गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

महिलांनी राजकारणात यायला हवं...

राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. आता स्त्रियांनी राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे. हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे असंही ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

... हे चित्र आनंददायी आहे!

आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे असा उल्लेखही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Mns Chief Raj Thackeray News
Sanjay Raut Answers Notice: संजय राऊत म्हणाले, हक्कभंगाच्या नोटीसीला उत्तर देणार..

महिलांनी हे सर्व निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे..!

स्त्रियांना १००, १५० वर्षांपूर्वी शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आज त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे असे गौरवोद्गारही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये महिलांविषयी काढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com