मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला पाठिंबा आणि सहभाग जाहिर केला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी पत्रक काढून मनसैनिकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मनसेच्या या सहभागामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी तीव्र रुप धारण करण्याची चिन्हे आहेत. या पत्रकात म्हटलं आहे की, राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपणा सर्वांना या पत्राद्वारे सुचित करण्यात येते कि, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होत आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. या संपावर तोडगा म्हणून आज दूपारी ३ वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यात त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन या समितीपुढे कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आणि मागण्या आहेत त्या मांडाव्यात आणि त्यावर १२ आठवड्यांच्या आत तोडगा काढावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच याबाबतच्या बैठकीचा ठळक वृत्तांत (मिनिट्स) सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकरला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी २९ ऑक्टोबरला मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. यात एसटी कामगारांना २८ टक्के महागाई भत्ता देणे आणि वाढीव घरभाडे भत्ता देणे अशा मान्य काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या मात्र त्यानंतरही वार्षिक वेतनवाढ आणि महामंडळाचे राज्य शासनात विलीणीकरण व्हावे या मागणीवर कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.