काळी मांजरे, कोल्हे, लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालतयं का?

कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) लगावला.
sanjaay raut
sanjaay rautsarkarnama

मुंबई : ''काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले पण, वाघासमोर काही चालत का? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) लगावला.

विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचा लोकपर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार बॅटींग केली. मुंबई महापालिकाची निवडणूक जवळ आली आहे. शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक करोनामुळे पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला (BMC Election 2022 ) दिले आहेत.

sanjaay raut
बालहट्टासाठी मेट्रो का रोखली ; साटम यांचा ठाकरेंना सवाल

चंद्रकांत पाटील म्हणतात, राऊत यांनी माझी तपासणी करावी, मी राऊतांचे डोके तपासतो!

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाही. श्री. पाटील यांनी काल येथे `मी संजय राऊत यांचे डोके तपासतो` असे म्हटल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहासाठी श्री. पाटील येथे आले होते. यावेळी खासदार राऊत यांनी कृषी कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतला. याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या विलंबाबाबत केलेल्या टिकेविषयी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचे डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे. काँग्रेसने एक कायदा तीनदा आणला व तीनही वेळेस तो कायदा रद्द करावा लागला, अशी आठवण करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com