Raj-Uddhav Thackeray : राज-उद्धव यांच्या युतीने मुंबईत महायुतीचे टेन्शन वाढले; 67 वॉर्डांत भाजप-शिंदेंचा खेळ बिघडणार?

Thackeray brothers alliance News : वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा विचार केला तर राज-उद्धव यांच्या युतीचा प्रभाव काही ठिकाणी दिसून येणार आहे.
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे एकत्र आली आहे. त्यामुळे मुंबईतील राजकारणात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा विचार केला तर राज-उद्धव यांच्या युतीचा प्रभाव काही ठिकाणी दिसून येणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतांवरून अनेक मराठीबहुल प्रभागांत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतांची बेरीज निर्णायक ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात हे समीकरण 67 वॉर्डांत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खेळ बिघडावू शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
BJP Election News: घासून नाही तर ठासून...! भाजपची दक्षिण भारतात दमदार एन्ट्री; कट्टर विरोधी राज्यात पहिला महापौर बनवला

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकानंतर एकत्र आले आहेत. चार दिवसापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील अन् महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. राज-उद्धव यांच्या युतीचा मुंबईत सर्वाधिक परिणाम पडण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
NCP News: पुण्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट; दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता मावळली असतानाच शरद पवारांचा बडा नेता अजितदादांना भेटला

उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे या दोघांच्या युतीमुळे 67 जागांवर निकाल फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी 2024 च्या विधानसभा निवडणूक निकालाचा दाखला देण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे भाजप अन् शिंदेंची शिवसेना यांची धडधड वाढली आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Congress BMC election : आघाडी तुटूनही काँग्रेस निभावणार छुपी मैत्री? मुंबईत ठाकरेंना फायदा होण्यासाठी व्यूहरचना

राज आणि उद्धव एकत्र आल्यास सुमारे 60 ते 80 वॉर्डांत जिथे मराठी मतदार निर्णायक आहेत, त्याठिकाणी मराठी मतांचे एकत्रीकरण झाल्याने महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील संघर्षामुळे भाजप आणि शिंदे गटाचा फायदा होत होता. मात्र, आता मतविभाजनाला ब्रेक लागणार असून आता मतविभाजन पूर्णपणे थांबणार आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Zilla Parishad election date: मोठी बातमी ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला? विधिमंडळाचे अधिवेशनच पुढे ढकलणार?

ठाकरे बंधू एकत्र आले असल्याने शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे. स्वतःला 'खरे शिवसैनिक' म्हणवणाऱ्या शिंदे गटासमोर ठाकरे या नावाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील 67 प्रभागांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
BJP Election News: घासून नाही तर ठासून...! भाजपची दक्षिण भारतात दमदार एन्ट्री; कट्टर विरोधी राज्यात पहिला महापौर बनवला

विधानसभा निवडणुकीतील मतांवरून अनेक मराठीबहुल प्रभागांत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतांची बेरीज निर्णायक ठरू शकते. वरळी, माहीम, शिवडी आणि दिंडोशीसारख्या भागांत दोन्ही पक्षांचे स्वतंत्र मते एकत्र आल्यास शिंदेसेना आणि महायुतीला आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती पालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Shivsena Mangesh Kalokhe murder case : राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा शिलेदार हत्यारा? शिवसेनेच्या काळोखेंच्या हत्येला राजकीय वळण, दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com