Boat Accident : धक्कादायक! गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीची धडक; प्रवाशांचा जीव धोक्यात!

Bhaucha Dhakka Boat Accident : मुंबईत पुन्हा एकदा एका नेव्हीच्या बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. या धडकेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
Boat Accident : धक्कादायक! गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीची धडक; प्रवाशांचा जीव धोक्यात!
Published on
Updated on

Summary :

  1. गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्याची घटना घडली.

  2. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अशाच अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता.

  3. या वेळेस जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mumbai News : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. एलिफंटा येथे जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटला नेव्हीच्या बोटने जोरदार धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू तर पंधराहून अधिक जखमी झाले होते. या घटनेत 65 हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात बचाव दलास यश आले होते. या घटनेच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच अशीच पुन्हा घटना घडली आहे. पुन्हा एकदा नेव्हीच्या बोटीने एका प्रवासी बोटीला धडक दिल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. मात्र नेव्हीच्या बोटींमुळे प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील भाऊचा धक्का येथून रेवस आणि मोरा अशी प्रवासी बोट सेवा सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.22) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट मोरा जेट्टी येथून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येत असतानाच मोरा बिकन आणि नेव्ही जेट्टीच्या दरम्यान नेव्हीच्या स्पीड बोटीने या प्रवासी बोटीच्या कडेला धडक दिली. या अचानक घडकेमुळे प्रवाशांत भीती पसरली होती. तर या वेळी बोटीत फक्त 10 प्रवाशी होते.

Boat Accident : धक्कादायक! गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीची धडक; प्रवाशांचा जीव धोक्यात!
Mumbai Boat Accident Big Update: एलिफंटला जाणारी बोट समुद्रात उलटली; CM फडणवीसांनी दिली मोठी माहिती

या घटनेनंतर आता डिसेंबर 2024 ला घडलेला घटनेच्या आठवणी पुन्हा ताजा झाल्या आहेत. 2024 च्या डिसेंबरमध्ये निलकमल बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीने अशाच प्रकारे धडक दिली होती. ज्यात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आता पुन्हा अशी घटना घडल्याने मुंबईत भाऊच्या धक्क्यावर खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात प्रवासी बोट मालकाने तक्रार केली आहे.

Boat Accident : धक्कादायक! गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीची धडक; प्रवाशांचा जीव धोक्यात!
Ujani Dam Backwater Boat Accident : बोट दुर्घटनेत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा बुडाल्याची शक्यता ?

FAQs :

प्रश्न 1: गेटवे ऑफ इंडियाजवळ काय घटना घडली?
उत्तर: नेव्हीच्या बोटीने पुन्हा एका प्रवासी बोटीला धडक दिली.

प्रश्न 2: यावेळी किती जणांचा मृत्यू झाला?
उत्तर: या वेळेस कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रश्न 3: याआधी अशा प्रकारचा अपघात झाला होता का?
उत्तर: होय, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अशाच अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com