Voter Bribery : भाव फुटलाच! मतदार कुटुंबाला 10 हजार? व्हिडिओ व्हायरल; निवडणूक आयोग निष्प्रभ?

Viral Voter Bribery Videos Ahead of Mumbai, Maharashtra Civic Polls : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होत असून, तत्पूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभन दिली जात आहेत.
Voter Bribery
Voter BriberySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra municipal elections : नगरपालिका निवडणुकीत एका मतदानाचा भाव 25 हजार रुपयापर्यंत गेल्याचं समोर आलं होतं. आता राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी थंडावला. आता छुपा प्रचारानं वेग घेतला आहे. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभन दिली जात आहेत.

मतदार कुटुंबासाठी 10 हजार रुपयापर्यंत प्रलोभन दाखवलं जात आहे. यातच मकर संक्रांतीच्या वाणांचा आधार घेत, उमेदवार मतदारांना गिफ्ट देत आहेत. यावर कारवाईची मागणी होत असताना, निवडणूक आयोग निष्प्रभ ठरत आहे. दरम्यान, मतदानाला अजून 18 तास बाकी असून, हा भाव गगनला भिडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान (Voter) होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार तोफा काल सायंकाळी थंडावल्या आहेत. आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. या छुप्या प्रचारात उमेदवारांना मतदारांना आकर्षित करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार पुन्हा संधी नाही, असे गृहीत धरून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे आणि वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप केले जात आहे, या प्रलोभनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

मुंबई (Mumbai), नवी मुंबई, पुणे इथल्या मोठ्या महापालिकांमधील राजकीय उमेदवार मतदारांना प्रलोभन देण्यात सर्वात पुढं आहेत. भांडुप इथं रविवारी मध्यरात्री महिलांना मोठ्या प्रमाणात प्रेशर कुकर आणि साड्यांचे वाटप करण्यात आल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.

Voter Bribery
Sispe scam : सिस्पे घोटाळ्यावर मंत्री विखेंचा घणाघात; ‘जुना-नवा लंके काय आहे ते..!’

मध्य मुंबईतील एका प्रभागामध्ये एका मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार साहित्यातून पैशांचे पाकिट घरोघरी पोहोचवली. तसा व्हिडिओच व्हायरल झाला आहे. यावर काँग्रेससह बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, राष्ट्रीय गणतंत्र पार्टी आणि मुंबईतील विविध अपक्ष उमेदवारांकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आयोग काय करतंय?

Voter Bribery
Saroj Ahire Politics: ‘या’ प्रभागात सुरू आहे विधानसभेचा संघर्ष; उमेदवारांपेक्षा आमदार सरोज अहिरेंचीच प्रचारात आघाडी!

आयोग काय करतंय?

मुंबई महापालिकेत आणि राज्यातही अनेक ठिकाणी मतदारांना सर्रासपणे पैसे आणि विविध वस्तूंचे वाटप करताना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. याची मतदानापूर्वीच खातरजमा करून निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय गणतंत्र पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी केली आहे.

पैशांचा बेफाम वापर

'धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, अशी ही मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू आहे. सत्तेतील लोकांकडून जनतेकडूनच लुटलेल्या पैशांचा बेफाम वापर सुरू आहे. पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असा घणाघात मुंबईतील काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

एका मतासाठी दहा हजार?

मुंबई महापालिका निवडणुकीत काही पक्षांकडून एका मतासाठी सुमारे पाच ते दहा हजारांपर्यंत प्रलोभन दाखवले जात असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी हा दर एका कुटुंबासाठी दहा हजारांपर्यंत आणून ठेवला असल्याचीही चर्चा आहेत. अहिल्यानगर महापालिकेतील एका प्रभागात देखील एवढंच प्रलोभन दिलं गेल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com