Maratha Protestors : जरांगेंनी आंदोलन केलं, जिंकलेही! उपोषण सोडताच सरकारने दिला पहिला झटका; पोलिसांची मोठी कारवाई

Police File Cases : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी आझाद मैदानाकडे धाव घेतली. यामुळे अेक ठिकाणी रस्ते अडवले गेले. तर काही ठिकाणी दमदाडीही झाल्याचा आरोप करण्यात आला.
Maratha Protestors
Maratha ProtestorsSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन केले.

  2. उपोषण संपताच पोलिसांनी आंदोलकांवर धडक कारवाई केली.

  3. मुंबईत आलेल्या अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

  4. या घटनेमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली.

  5. महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनाक्रमामुळे नवे वादंग पेटले.

Mumbai News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन्हा एकदा एल्गार पुकारला. त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन उभे केले. या मागणीसाठी त्यांनी पाच दिवस उपोषण केल्यानंतर महायुती सरकारने त्यांच्यासमोर शरणागती पत्कारली. यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश काढण्यासह इतर पाच मागण्या मान्य केल्या. तर इतर दोन मागण्यासांठी वेळ मागून घेतला. यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आणि समाज बांधवांना गावाकडे निघा असे आदेश दिले. यानंतर काहीच तासात भरलेले रस्ते मोकळे झाले. जरांगे उपचासाठी रूग्णालयात दाखल होण्याच्या आधीच सरकारने झटका दिला. पोलिसांनी मराठा आंदोलक मुंबईतून बाहेर पडण्याच्याआधी मोठी कारवाई केली. मुंबईत आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

मराठा आरक्षणाच्या मागणी उपोषणावर बसलेल्या जरांगे यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. यातील अनेकांना आझाद मैदावर बसण्यास जागाही मिळाली नाही. यामुळे जेथे जागा मिळेल तेथे आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. यामुळे चर्च गेट, मुंबई उच्च न्यायालयाचा परिसरासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक दिसत होते. यादरम्यान मराठा आंदोलकांनी मरिन ड्राईव्ह देखील समुद्रात उतरण्याचा प्रयत्न केला. तसेच कुठे कुठे दमदाटी केल्याचाही त्यांच्यावर आता आरोप केला जात आहे. या नव्या मुद्द्यामुळे आता वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

Maratha Protestors
Maratha Protestors Crime Record : मोठी बातमी : मराठा आंदोलकांच्या गुन्हेगारी रेकाॅर्डचे संकलन सुरू ?

अशातच आता या आंदोलकांवर आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, डोंगरीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई पोलिसांनी एकूण 9 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. तर हे गुन्हे अज्ञात आंदोलकांवर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान रविवारी (ता.31) जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील झोन 1 च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 2 तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे, प्रलंबित जात पडताळणीला मान्यतेसह आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता अशा मागण्या मान्य झाल्या आहेत. तर सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली असून मराठा-कुणबी एकच शासन निर्णय काढण्यास 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Maratha Protestors
Manoj Jarange : परभणीला येऊन बीडला न गेल्यामुळे राहुल गांधींवर जरांगे पाटील संतापले; म्हणाले,'त्यांच्याकडे डिझेलला पैसे...'

FAQs :

प्रश्न 1: आंदोलन कुठे झाले?
➡️ मुंबईतील आझाद मैदानावर.

प्रश्न 2: आंदोलन का झाले होते?
➡️ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी.

प्रश्न 3: पोलिस कारवाई कधी झाली?
➡️ उपोषण संपल्यानंतर लगेच.

प्रश्न 4: कारवाईत काय झाले?
➡️ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

प्रश्न 5: या घटनेचा काय परिणाम झाला?
➡️ मराठा समाजात रोष वाढला आणि राजकीय वातावरण तापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com