Police Letter Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळणार? 'त्या' वक्तव्यांवर स्पष्टीकरण मागितले!

Mumbai Police Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आता पोलिसांनी जरांगे पाटील यांना पत्र लिहून त्यांच्यासोबत असलेल्या स्वयंसेवकांची संख्या आणि इतर माहिती मागवली आहे.
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठी पत्र दिले आहे. याआधी आंदोलनासाठी परवानगी देण्यास तब्बल तीन वेळा पोलिसांनी नकार दिला आहे. आता जरांगे पाटील आंदोलनाच्या परवानगीसाठी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यातच आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांनी नोटीस पाठवून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच आंदोलनाची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे.

जरांगे पाटील यांनी या आधीच्या पत्रात आपण एकटेच आंदोलन करणार आहोत, आपल्यासोबत 50 लोकं असतील, असे म्हटले होते. मात्र, ते मुंबईला निघालेले असताना त्यांच्यासोबत मोठा जनसमुदाय दिसून येतो आहे, याबाबत खुलासा करण्यास पत्रात सांगितले आहे.

तसेच जरांगे पाटील यांनी त्यांच्यासोबत किती स्वयंसेवक असणार आहेत, वाहनांचा तपशील, व्यक्तींची संख्या आणि स्वयंसेवकांची यादी सादर करण्यास सांगितलेआहे. जरांगे पाटील यांनी पोलिसांनी आपणे एकटेच आंदोलन करणार असे सांगितले आहे मात्र माध्यमांमधून त्यांनी मराठा समाजाला बॅगा भरून तयार राहा,वर्गणी तशीच राहू द्या मी म्हणेल तेव्हा मुंबईला या, असे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात विरोधाभास आहे, असे देखील पोलिसांनी नमूद केले आहे.

Manoj Jarange
Mumbai Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांचा यू-टर्न? 5 हजारांऐवजी आता 50 समर्थकांसह मुंबईत आंदोलन, हुल्लडबाजीला लगाम

नारायण गडाचे महंत जरांगेंच्या भेटीला

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. ते आज पाटोद्याहून अहिल्यानगरकडे निघणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत यासाठी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हे जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील जरांगेना भेटण्यासाठी आले आहेत.

मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राधेकृष्ण विखे पाटील चर्चा करतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत चर्चा करू शकतात. सध्या सणावाराचे दिवस आहेत त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊ नये.

Manoj Jarange
Manoj Jarange Mumbai Protest : जरांगे मुंबईसाठी रवाना! पाटलांसाठी खास गाडी अन् ताफा तयार, पाहा Exclusive अपडेट्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com