Municipal Council Results : नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीच, 'हा' आहे पर्याय; मोठ्या मंत्र्याने सांगितली आतली बातमी

Municipal Council Election Hasan Mushrif : नागपूर खंडपीठाच्या निकालानंतर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 तारखेला जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयाच्या विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
Hasan Mushrif says state government will approach the High Court; Nagar Panchayat–Parishad results expected before December 21.
Hasan Mushrif says state government will approach the High Court; Nagar Panchayat–Parishad results expected before December 21.Sarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif News : नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने मंगळवारी महत्त्वाचा निकाल दिला. या निकालानुसार या निवडणुकीचा तीन डिसेंबरला जाहीर न होता तो 21 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबरही तारीख निकालासाठी दिली आहे. कारण काही नगपंचायत आणि नगरपरिषदेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदान झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना 21 डिसेंबरच्या आधीच निकाल लागेल असा दावा केला.

मुश्रीफ यांनी सांगितले की, नागपूर खंडपीठाने जो निकाल दिला आहे. त्याच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाईल. त्यामुळे निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीच लागण्याची शक्यता आहे.

Hasan Mushrif says state government will approach the High Court; Nagar Panchayat–Parishad results expected before December 21.
Municipal ward formation dispute : महापालिकांच्या प्रभागरचनेवर आक्षेप, सरकारने कायदाच बदलला; याचिकेनंतर न्यायालयात घमासान

दरम्यान, काही नगरपंचायत आणि नगपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून निवडणूक आयोगावर राजकीय नेते टिका करत आहेत. त्याला आयोगाकडून उत्तर देण्यात आले आहे. निवडणुका या राजकीय नेत्यांच्या मतानुसार घेतल्या किंवा पुढे ढकलल्या जात नाही तर कायद्यानुसार त्यावर निर्णय घेण्यात येतो, असे म्हटले.

महापालिका निवडणूक डिसेंबरमध्येच

नगपंचायत निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणूकीच्या आधी महापालिका निवडणूक होण्याची शक्यता असून 15 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Hasan Mushrif says state government will approach the High Court; Nagar Panchayat–Parishad results expected before December 21.
Maharashtra Politics: नगरपालिका निवडणुकांनी भाजपचा आत्मविश्वास वाढला, महापालिकांसाठी देवा भाऊंचे स्वबळाला प्राधान्य?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com