Nagarsevak Salary : नगरसेवकाचा पगार वाचून तुम्हीही थक्क व्हाल! पदासाठीच्या चुरशीमागचे 'हे' आहे खास कारण!

reasons behind political race for nagarsevak post : नगरसेवकाचे मानधन किती ? या पदासाछी मोठी राजकीय चुरस का असते? यामागची खरी कारणे जाणून घ्या.
nagarsevak salary per month Maharashtra
nagarsevak salary per month MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. या रणधुमाळीत तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की निवडणुकीची एवढी धामधूम सुरू आहे पण या नगरसेवकपदासाठी नेमकं मानधन तरी किती असतं? खरंतर नगरसेवकांना दरमहा मिळणारे मानधन आणि भत्त्याची रक्कम पाहिली तर फारशी आकर्षक नसते.

निवडून आलेल्या नगरसेवकाला दरमहा फक्त 10 हजार रुपये मानधन दिले जाते. याशिवाय प्रत्येक सभेला उपस्थित राहिल्यास 400 रुपये उपस्थिती भत्ता मिळतो. म्हणजे 5 वर्षांच्या कार्यकाळात हे मानधन एकूण 6 लाख रुपयांपर्यंत जाते, तर सुमारे 60 सभा झाल्यास भत्त्याची रक्कम फक्त 24 हजार रुपये होते. म्हणजेच 5 वर्षांत मिळणारे अधिकृत उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे. मग अनेकांना प्रश्न पडतो की एवढ्या कमी उत्पन्नासाठी निवडणूक लढवण्याची गरजच काय?

nagarsevak salary per month Maharashtra
TET परीक्षेच्या टेन्शनमधून आता सुटका? केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाने होणार लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवित

यंदा महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. प्रमुख राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवारांची देखील मोठी संख्या आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याने प्रत्येक प्रभागात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात लाखो नव्हे, तर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न कायम असतो की इतके कमी मानधन असूनही नगरसेवक होण्यासाठी एवढी धडपड का केली जाते?

याचे उत्तर केवळ मानधनात नाही, तर राजकारणातून मिळणाऱ्या संधींमध्ये दडलेले आहे. नगरसेवकपद हे राजकारणातील पहिली पायरी मानली जाते. याच महापालिकेच्या राजकारणातून अनेक जण पुढे आमदार, खासदार झाले आहेत, तर काहींना मंत्रिपदाचीही संधी मिळाली आहे. त्यामुळे नगरसेवक म्हणून मिळणारे वलय आणि ओळख ही पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाची ठरते. यंदा बऱ्याच वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांत उमेदवारांची गर्दी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com