Sujay Vikhe speech : जगतापांसमोर विखेंचा राजकीय ‘एक्स-रे’; दाढी, कटिंग, चष्मा, घड्याळ… काहीच सुटलं नाही!

Sujay Vikhe Political Analysis at Kedgaon Meet Ahead of Ahilyanagar Municipal Polls : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी केडगाव इथं प्रचारसभेत सुजय विखे यांनी महापालिकेच्या राजकारणावर भाष्य करत सूचक इशारा दिला.
Sujay Vikhe speech
Sujay Vikhe speechSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केडगाव इथली प्रचार सभा चांगलीच, चर्चेत आहे. सुजय विखे पाटील यांनी सभेत खासदारकीच्या पराभवाची सल बोलून दाखवण्याबरोबरच अहिल्यानगर महापालिकेतील नगरसेवकांच्या राजकारणावर आपल्याला किती अभ्यास आहे, याची मांडणी आमदार संग्रामभैय्या जगतापांसमोर केली.

तसंच आपल्या साध्या राहणीमानावर बोलताना, भैय्यांच्या स्वच्छ राहणीमानावर मिश्किल टिप्पणी केली. या सभेत त्यांनी अहिल्यानगर महापालिकेत भाजप-अजित पवार महायुती 55 आकडा गाठून बहुमत मिळवेल, असा दावा केला.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) प्रचाराच्या आज सायंकाळी तोफा थंडावल्या. तत्पूर्वी कालपासून नुसता प्रचाराचा धुरळा सुरू होता. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांची केडगाव उपनगरात झालेली प्रचार सभा चर्चेत आली. या सभेत सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर महापालिकेतील नगरसेवकांच्या राजकारणावर केलेले भाष्य, अनेक अर्थाने आता चर्चेत येऊ लागलं आहे.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "अहिल्यानगर जनतेने महापालिकेत नेहमीच संमिश्र कौल दिला आहे. पाच लोक याचे, दहा लोक त्याचे, तीन लोक अपक्ष, चार लोक कोणी वेगळ्या पक्षाचे आणि यातून महापालिकेत 'खिचडी' तयार व्हायची. यामुळे महापौर निवडीत कोणी इकडेचे पाच लोक घेऊन पळाला, कुणी दहा लोक घेऊन लोणावळ्याला गेला, कुणी रस्त्यात चालत येणारा उमेदवार बसमध्ये बसून परत दुसरीकडे घेऊन गेला, दोनदा अशी परिस्थिती झाली होती की महापौर पदाच्या निवडी वेळेस उमेदवार पळून गेले. यामुळे अहिल्यानगर शहराचा विकास या सर्व 'खिचडी'मुळे खुंटला आहे."

Sujay Vikhe speech
The Great Khali BJP : ‘द ग्रेट खली भाजपचा कार्यकर्ता कधीपासून?’ अहिल्यानगरमधून देशातील युवकांना थेट आवाहन

'घोडेबाजार वाढला, नगरसेवकांच्या बोली लावल्या जायच्या, सगळ्यात मोठी शोकांतिका अहिल्यानगरच्या, अशी होती की, महापालिकेमध्ये ठराविक लोक, काही ठराविक नगरसेवक आपली, नीतिमत्ता मागे सोडून स्वतःची बोली लावून, जो कोणी मत मागतोय, आपली बोली लावली जायची, मतदान टाकून कोणीही महापौर व्हायचं,' असा टिप्पणी सुजय विखे पाटलांनी केली.

Sujay Vikhe speech
BJP Sujay Vikhe Patil : 'माझा माज कोणीच मोडू शकत नाही, तसा अजून...'; सुजय विखेंची तुफान फटकेबाजी

'अहिल्यानगरने हे देखील पाहिलं आहे की, महापौर एका पक्षाचा, तर उपमहापौर दुसऱ्या पक्षाचा. स्थायी समितीच्या सभापतीपदी तिसरा पक्ष, चार अपक्ष, चार समितीचे सभापती, स्वीकृताचा लाडूचं असंच वाटप होतं. या सर्वात भरडली गेली ती, अहिल्यानगरची जनता, महापालिकेच्या कार्यालयात गेलं तर अधिकाऱ्यांची मजुरी वाढलेली, सर्वसामान्यांना महापालिकेच्या कार्यालयात कधीही दाद मिळाली नाही. अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. यामुळेच संग्राम भैय्यांना बरोबर घेऊन बसलो आणि उमेदवारांना थांबून युती करण्याचं ठरवल्याचं,' सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

'अनेकांनी माझे विरोधात काम केलं, त्यांना देखील उमेदवारी द्यावी लागली, काही लोक माझ्या विरोधात पळाले, काही लोक भैय्यांच्या विरोधात पळाले. पण आम्ही दोघांनी ठरवलं की आमच्या दोघांचा स्वाभिमान, अहंकार हा अहिल्यानगर शहराच्या विकासापेक्षा मोठा नाही आणि सगळ्या तडजोडी केल्या. ही युती महापालिकेत, 55 पेक्षा जास्त जागा जिंकेल,' असा विश्वास सुजय विखे पाटलांनी व्यक्त केला.

भैय्यांच्या दिसण्याविषयी मिश्किल टिप्पणी

केडगावकरांना बायपासमुळे चांगलाच फायदा होताना दिसतो आहे. मला माहित होतं बायपास होणार आहे. पण तुमच्याकडे सिस्टीम आहे की, एखादा प्रकल्प यायच्या अगोदर सर्व जमिनी विकत घ्यायच्या, आणि मग प्रकल्प करायचा, म्हणजे आपल्या जमिनीचे भाव वाढतात. पण मला पैशाची गरज नाही. तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटत असेल, मला पैशाची आवश्यकता आहे. पण तशी परिस्थिती नाही. हा भैय्यांची परिस्थिती दिसण्यात बरी आहे, ते दाढी करतात, कटिंग करतात, चष्मा.., घड्याळ.., आज चपला घातल्यात. मी आपला असाच फिरत राहतो, ना आपल्याला दाढीचा खर्च, न केस कापायचा खर्च, न कपड्यांचा खर्च, अशी सुजय विखे पाटलांनी टिप्पणी करताच सभेत एकच हशा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com