Murlidhar Mohol Oath : मुरलीधर मोहोळांसह महाराष्ट्रातील 'या' मंत्र्यांनीही संसदेत शपथ घेताना जपला 'मराठी बाणा'!

Muralidhar Mohol took oath in Marathi : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
Sarkarnama
SarkarnamaSarkarnama

Muralidhar Mohol Parliament Membership Oath : आजपासून 18व्या लोकसभेचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू झाले आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

सभागृह नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यासोबतच संसदेचे प्रोटेम स्पीकर भृतहरि महताब यांनी अन्य सदस्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांनी संसदेत मायबोली मराठीमधून शपथ घेत मराठी बाणा जपल्याचे दिसून आले. यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) आणि शिवसेनेचे बुलडाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे.

Sarkarnama
Narendra Modi Oath : नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, विरोधकांनी दाखवले संविधान; सभागृहाबाहेरही आंदोलन

18 व्या लोकसभेचं हे पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीस नव्या लोकसभा प्रतिनिधींचा शपथविधी पार पडला. मुरलीधऱ मोहोळ(Murlidhar Mohol) हे पहिल्यांदाच खासदार झाले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना थेट मोदी सरकारमध्ये सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री पदही मिळालं आहे. तसेच भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मोहोळ यांना जवळून काम करता येणार आहे.

Sarkarnama
Praniti Shinde : संसदेच्या पायऱ्या चढताना प्रणिती शिंदे भावूक झाल्या; जुने संसद भवन हवे होते..!

मुरलीधर मोहोळ यांनी काय घेतली शपथ? -

'मी मुरलीधर मोहोळ लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, परमेश्वरास स्मरूण शपथ घेतो की मी विधिद्वार स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारती सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे, ते मी नेकीने पार पाडीन.' अशाप्रकारे मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली.

मोहोळांनी ट्वीटद्वारे व्यक्त केल्या भावना -

'खासदारकीची शपथ मायमराठीत…१८ व्या लोकसभेचा सदस्य म्हणून आज मायमराठीत शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू !' असं मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट केलं आहे.

(Edioted by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com