Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मोदी शपथ घेत असताना विरोध पक्षातील काही सदस्यांनी त्यांना संविधानाची प्रत दाखवली. तर, मोदी शपथ घेत असताना सभागृहा बाहेर विरोधकांकडून आंदोलन केले जात होते. संविधानाच्या प्रती होतात घेवून विरोधक आंदोलन करत होते.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भर्तूहरी महताब यांची नियुक्त झाल्यानंतर त्यांनी सदस्यांना शपथविधी देण्यास सुरवात केली. सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे शपथविधीसाठी आले. आपल्या डेस्कवरून ते शपथविधीसाठी जात असताना सदस्यांनी डेस्कवाजवले. तर, पंतप्रधान मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना विरोधपक्षातील काही सदस्य त्यांना भारतीय संविधाची प्रत दाखवत होते.
संसद परिसरात विरोधकांनी हातात संविधान घेत आंदोलन केले. संविधान की रक्षा कोण करेगा हम करेंगे हम करेंगे, असा घोषणा विरोधक देत होते. संविधानाच्या प्रती हातात घेवून मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी Rahul Gandhi, सोनिया गांधी या आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.