LokSabha Election 2024 : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; मराठवाड्यातला फॉर्म्युला ठरला

Political MVA news : मराठवाड्यातील आठही जागांचे वाटप फायनल झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक चार जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत.
nana patole, Prakash Ambedkar, Sharad pawar, Uddhav thackrey
nana patole, Prakash Ambedkar, Sharad pawar, Uddhav thackreySarkarnama
Published on
Updated on

Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील आठही जागांचे वाटप फायनल झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक चार जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चार, तर काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्यात येणार असल्याचे समजते.

nana patole, Prakash Ambedkar, Sharad pawar, Uddhav thackrey
Uddhav Thackeray : 'पक्षांतरबंदी' समितीवर नार्वेकरांची निवड होताच उद्धव ठाकरेंचा संताप

ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व हिंगोली या चार जागा त्यांच्या वाट्याला येणार आहेत. काँग्रेसला नांदेड, जालना, लातूर या तीन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बीडची एक जागा वाट्याला येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी काँग्रेसने गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड, लातूर, सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या दोन जागा अशा १६ जागेंची मागणी केली आहे. तर

राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) भंडारा-गोंदिया, बीड, शिरूर, बारामती, सातारा, माढा, कोल्हापूर, रावेर, अहमदनगर, दिंडोरी, रायगड, कल्याण आणि मुंबईतल्या काही जागा अशा १४ जागेंची मागणी केली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई. ईशान्य मुंबई, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, हिंगोली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिधुदुर्ग, बुलढाणा, नगर, शिर्डी, नाशिक, मावळ, बुलढाणा, वाशीम आता असलेल्या 18 जागांसोबत मुंबईत एक जागा जादा हवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते.

कोल्हापूर, नाशिक, रायगड, हिंगोली या चार मतदारसंघावर आघाडीतील दोन किंवा तीन घटक पक्षाने दावा केला असल्याने या मतदार संघावरून रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. या आठवड्यात होत असलेल्या बैठकीत या जागावाटपावर चर्चा होऊन त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

nana patole, Prakash Ambedkar, Sharad pawar, Uddhav thackrey
LokSabha Elections 2024 : राऊतांनी वाढवली पवारांची धडधड; ठाकरे गट किती जागा लढवणार? आकडा केला जाहीर

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com