Vidarbha Politics: विदर्भात NCP मध्ये बंड; तीन टर्म आमदार असलेल्या खोपडेंचा विजयरथ पांडे अडवणार?

Nagpur East Assembly Constituency Election 2024 : कृष्णा खोपडे आणि पांडे यांच्या कुटुंबात महापालिकेच्या निवडणुकीपासून वैर आहे. बिज्जू पांडे यांना कृष्णा खोपडे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत केले होते. आभा पांडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Krishna Khopde Vs Abha Pandey: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी महायुतीचे पूर्व नागपूरचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात दावेदारी दाखल केली आहे. बंडखोरांमधून पहिला उमेदवार अर्ज त्यांनी आज सादर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या तेव्हापासूनच आभा पांडे यांनी पूर्व नागपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. यावरून पूर्व नागपूरचे दावेदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासोबत त्यांचे खटके उडत होते. अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले तेव्हा त्या त्यांच्यासोबत गेल्या.

पेठे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आभा पांडे यांचे पक्षांतर्गत विरोध आपसूकच संपला होता. मात्र हा मतदारसंघ भाजपचा असल्याने तो राष्ट्रवादीसाठी सुटणार नाही हे जाहीर होते.

असे असले तरी आभा पांडे यांनी पक्षाने उमेदवारी दिली तरी नाही दिली तरी निवडणूक लढणारच हे दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. आपल्याला आमदार खोपडे यांना पराभूत करायचे असे त्यांचे म्हणणे आहे.

Ajit Pawar
Mahayuti Seat Sharing: महायुतीत बंडाचं निशाण फडकलं! मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारानं थोपटले दंड

कृष्णा खोपडे आणि पांडे यांच्या कुटुंबात महापालिकेच्या निवडणुकीपासून वैर आहे. बिज्जू पांडे यांना कृष्णा खोपडे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत केले होते. आभा पांडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत.

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी त्यांना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले होते. त्यानंतर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले. नंतर त्या महापालिकेच्या निवडणुकी अपक्ष निवडूण आल्या. नंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या.

पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पांडे यांनी जरी खोपडे यांना पराभूत करायचे आहे, असे सांगितले असले तरी त्यांच्या बंडाचा फटका पेठे यांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com