Mahayuti Seat Sharing: महायुतीत बंडाचं निशाण फडकलं! मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारानं थोपटले दंड

Pathri Assembly Elections 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सईद खान यांची ओळख आहे. शिवसेना नेते, कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. 'खंजीर खुपसला...' असे म्हणत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
Mahayuti
MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी बुधवारी जाहीर केली. यादीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून (Pathari Assembly election 2024) निर्मला उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विटेकर या आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री आहेत. त्याचे नाव जाहीर होतात महायुतीतील शिवसेना नेते सईद खान यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे पाथरी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे.

"मी ही विधानसभा निवडणूक लढवणारच," असे ठामपणे सांगत 29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असे सईद खान यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सईद खान यांची ओळख आहे. शिवसेना नेते, कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. 'खंजीर खुपसला...' असे म्हणत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सईद खान यांनी बंडाचं निशाण फडकवताच त्यांच्या समर्थकही शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'करण्याच्या तयारीत आहे. सईद खान यांनी निवडणूक लढण्याचा हालचाली सुरु केल्या असून त्यांची समजूत काढण्यात महायुतीला नाकेनऊ येणार आहे. तीनही पक्षातील वरिष्ठ नेते पाथरीतील पेच सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना यात किती यश मिळते, हे लवकरच समजेल.

Mahayuti
Solapur Politics: सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला; पण, माजी आमदाराच्या पोस्टनं वाढवलं आघाडीच्या नेत्याचं टेन्शन

या मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासमोर विटेकर यांनी आव्हान दिले आहे. 'विटेकर विरुद्ध वरपूडकर' असा परंपरागत संघर्ष या मतदारसंघात पूर्वीपासून आहे. निर्मलाताई विटेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पाथरी मतदारसंघातूनच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने तयारी करत असलेल्या सईद खान यांच्यासमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com