Nagpur Violence : धक्कादायक! महिला पोलिसाचा विनयभंगाचा दावाच CM फडणवीस खोडून काढला? स्पष्टीकरणात म्हणाले...

CM Devendra Fadnavis On Nagpur Violence : नागपूर हिंसाचार उफाळला असतानाच एका महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याचा दावा पोलिसांनीच केला होता. यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात होता. तर यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
Nagpur Violence-Devendra Fadnavis
Nagpur Violence-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर हिंसाचारामुळे अख्खा महाराष्ट्रात संतापला आहे. औरंगजेबच्या कबरीवरून सुरू झालेल्या वाद नागपुरात दंगलीत बदलल्याने आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर दंगली दरम्यान पोलिसांवर झालेला हल्ल्याने दंगलखोरांविरोधात कठोर पावले सरकारने उचलावित अशी मागणी केली जातेय. या दंगलीदरम्यान एका महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता हा दावाच फोल ठरल्याचे समोर आले आहे. पोलिसांनीच केलेला दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढल्याने आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. ज्यात अनेक पोलिस जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच येथे दंगलखोरांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचे समोर आले होते. यावेळी दंगलखोऱ्यांनी त्या महिला पोलिसाला शिवीगाळ करत तिच्या वर्दीवर देखील हात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यामुळे जर पोलिसच सुरक्षीत नसलीत तर कायद्याचा धाक कुठे आहे? अशा दंगलखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

पण आता या दाव्यातच ट्विस्ट निर्माण झाला असून त्या दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग झालाच नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर विनयभंग झालाच नाही, तर मग त्या पोलिस महिलेने तसा दावा का केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nagpur Violence-Devendra Fadnavis
Nagpur Violence : मोहम्मदला दंगलीची आधीच कल्पना होती का? संपूर्ण घटनेचे केले लाईव्ह चित्रीकरण

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करताना, महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. तिच्यावर दगडफेक झाली. विनयभंगाच्या बातम्या चुकीच्या आहेत. विनयभंग झाला नसल्याची माहिती पोलिस आयुक्तांनीच आपल्याला दिली असल्याचे फडणवीसांनी म्हटल आहे.

यादंगलीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सरकारला घेरलं जातयं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आताच अशा दंगली कशा उसळतात असा सवाल केला आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, सत्ताधारीच राज्यातील वातावरण दुषित करताहेत, असा आरोप केला आहे.

Nagpur Violence-Devendra Fadnavis
Nagpur violence Update : नागपूर दंगलप्रकरणी मोठी अपडेट; एमडीपीच्या अध्यक्षानंतर कार्यकारी अध्यक्ष अन्‌ एका युट्यूबरला ठोकल्या बेड्या

यावरुन विरोधक आक्रमक झालेत. आताच दंगली कशा उसळतात, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय. सत्ताधारी वातावरण दुषित करताहेत. पोलीस सत्ताधा-यांच्या दबावात आहेत, असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com