Nagpur Winter Session : चुलीत घाला मंत्रिमंडळ विस्तार; आमदार बच्चू कडू भडकले

Maharashtra Political News : सत्ताधारी आमदाराचा सरकारवर जोरदार 'प्रहार'
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Political News : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरली. सरकारसोबत आहे म्हणून काय सरकारला घाबरून राहायचं का? इथे उठ तिथं बस असं करीत गुलाम म्हणून राहायचं का, असा सवाल कडू यांनी केला.

काँग्रेसच्या काळात आणि भाजपच्या काळात शेतकऱ्यांची लूट झाली. असं नमूद करीत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना घेऊन भाजप सरकारवरती आरोप केला. आपण दिल्ली आणि मुंबईतील सरकारसमोर झुकणारा नाही, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. आमदार कडू यांनी शुक्रवारी विधान भवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Bachchu Kadu
Maharashtra Winter Session : राजेश राठोड यांच्या संरक्षणासाठी नीलमताई गोऱ्हे आल्या मदतीला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक काय म्हणतात तो एक प्रश्न आहे. लोकांनी नवाब मलिकांची प्रतिक्रिया घ्यायला पाहिजी होती. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) काय म्हणतात, हे जाणून घ्यायला हवे होते. त्यानंतर खरा खेळ सुरू होणार आहे. पवार यांच्याशी बोलल्यानंतर पत्राचा किती प्रभाव आहे, की अभाव आहे. कोण पुढे जात हे समजून जाईल. प्रहारची याबाबत भूमिका काय असे विचारले असता, आमदार कडू म्हणाले, मी या फालतू गोष्टींमध्ये लक्ष देत नाही. आपण शेतकरी, शेतमजूर, अपंग, गरीब यांच्याबद्दल जास्त बोलतो. याच विषयांकडे जास्त लक्ष देतो.

काँग्रेसवाले काय इतकी वर्षे झोपले होते का, की अमेरिकेत फिरायला गेले होते. काँग्रेसची सत्ता असताना 50 टक्के नफ्यासह भाव दिला नाही. त्यामुळे पहिला प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारला पाहिजे आहे. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारलादेखील हाच प्रश्न आहे.

सरकार कोणाचेही असो त्यांना शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावाच लागेल. शेतकऱ्यांना किमान किती खर्च भेटणार आहे, हे कळायला हवं. नोकरदारांना जसा किमान किती वेतन मिळणार आहे, हे ठाऊक असते. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनाही किमान वेतन मिळायला हवं. त्यांचं किमान वेतन का काढलं जात नाही, असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांबद्दल विधिमंडळात भूमिका मांडणार आहे. आपल्याला सरकारचं काहीही महत्त्व नाही. सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय, यामुळे काहीही फरक पडत नाही. आम्हाला शेतकरी, शेतमजूर महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी जेवढी ताकद लावायची ती लावू. हा लढा आपण इमानदारीने लढू, असं ते म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की, आम्ही 14 हजार भाव शेतकऱ्यांना दिला.

अनिल देशमुख यांना आपला प्रश्न आहे की, तुम्ही असं कसं वक्तव्य करू शकता. बाजारात चढउतार आहे. आयात-निर्यात असते. जगात भाव वाढल्यानंतर त्याचे परिणाम दिसतात. आम्ही भाव दिला असं ते म्हणत आहेत. विधानसभेत आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट झाली. भाजपच्या काळातही लूट सुरू आहे. हे सर्व मुद्दे आपण सभागृहात मांडणार आहोत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे, म्हणून घाबरण्याचे कारण नाही. आपण सरकारमध्ये आहोत म्हणून काही गुलाम म्हणून राहू शकत नाही.

आपण दिल्ली, मुंबईवाल्यांचे गुलाम नाही, असेही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्पष्ट केले. आपल्याला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे की, अजित पवारांवरती आरोप होते, तर मग उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांसोबत शपथ कशी घेतली, असा प्रश्नही आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

(Edited by Sachin Waghmare)

Bachchu Kadu
Bacchu Kadu News : बच्चू कडू यांची अवस्था बिनहत्यारी सैनिकासारखी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com