Monsoon Session : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर बॅकफूटवर आलेल्या सत्ताधारी पक्षाला घेरण्याची संधी विरोधी पक्षाकडे चालून आली आहे. त्या संधीचा फायदा घेत विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्य विधिमंडळांच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवातीच्या दोन दिवसांत विरोधी पक्षाने आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला आहे.
शनिवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. (Nana Patole News)
राज्यातील महायुती सरकारला आता तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली आहे. सरकारने बजेट सादर केलं, घोषणा केल्या पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सरकार आता खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली असली तरी यासाठी निधी आवश्यक आहे. तरच ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असल्याची टीका यावेळी नाना पटोलेंनी केली.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी, असं सगळं झालंय. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.
वारकरी पंथाची लोक येऊन गेली. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने केला असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.