Vinayak Raut News : 'शिवसेना संपवणार म्हणणारे राणे मुलाच्या प्रचारासाठी धनुष्यबाण घेऊन दारोदारी फिरतायेत'

Political News : राणेंचा पराभव करण्याच्या या कुडाळ मालवणमध्ये इतिहास झाला. त्याच राणेंच्या मुलाचा निलेश राणे यांचा पराभव करायची संधी पुन्हा वैभव नाईक यांना मिळाली आहे.
Vinayak Raut
Vinayak Raut,Narayan Rane:Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : लोकसभेला जसा भाजपचा सुपडासाफ झाला तसा आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. आता विधानसभेत महाविकास आघाडीचे 180 जागांवर उमेदवार निवडून येणार आहेत. इटूकली, बिटूकली राणेंची काय अवकात, राणे तुमची अवकात काय ? उध्दव ठाकरेंना अडवण्याची हिंमत मोदीमध्ये देखील नाही. उद्धव ठाकरे ना धमकी देणे सोडून दया, असा इशारा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.

लोकशाहीची कुचेष्टा नारायण राणेंनी केली आहे. आज बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असे म्हणणाऱ्या नारोबाची बाळासाहेबांनी हकालपट्टी केली. राणेंनी शिवसेना संपवणार अशी घोषणा केली होती. त्याचं राणेंना 2024 साली मुलाच्या प्रचारासाठी धनुष्यबाण घेऊन दारोदार फिरावे लागत असल्याची टीका यावेळी विनायक राऊत यांनी केली. (Vinayak Raut News)

राणेंचा पराभव करण्याच्या या कुडाळ मालवणमध्ये इतिहास झाला. त्याच राणेंच्या मुलाचा निलेश राणे यांचा पराभव करायची संधी पुन्हा वैभव नाईक यांना मिळाली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेच्या पैसा लुबाडण्याचे काम सुरू आहे, असा आरोप यावेळी विनायक राऊत यांनी केला.

चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगावं चिपी विमानतळ बंद का पडलं? राणेंना चिपी विमानतळ बंद झालं याचा थांग पत्ता लागला नाही, ते विमानतळ पुन्हा मीच सुरू करणार. राणेंना त्या विमानतळावरून यायचं नाही, मात्र सर्वसामान्य लोकांना इथून यायचं आहे, असेही विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

Vinayak Raut
Assembly Election: राज्यातील 35 जागांवरचा जय-पराजयाचा खेळ ठरविणार सत्ता कुणाची ?

राऊतांचा गंभीर आरोप

दिल्लीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला मेल करून राणेंनी मिळालेल्या खात्यामुळे बट्ट्याबोळ केला. राणेंच्या पीएनी कमिशन घेतले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी या पत्राची दखल घेत राणेंना मंत्रिमंडळात समावेश केला नसल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

दीड हजार देऊन आमच्या भगिनीची चेष्टा करता. आमची सत्ता आल्यास आम्ही पंचसूत्रीमधून भगिनींना 3000 रुपये देणार आहोत. मात्र, आमची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. आमची सत्ता आल्यास 65 वर्षांवरील नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दुर्दैवाने हे महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचा हा शेवटचा हप्ता, असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vinayak Raut
Poonam Mahajan: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पूनम महाजनांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; केला 'हा' गंभीर आरोप

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांना मोफत बस सेवा, 25 हजार महिलांची पोलीस भरती, महागाई वाढली त्यामुळे यांच्या 1500 रुपयात पिशवी तरी भरेल का? असा सवाल यावेळेस विनायक राऊत यांनी केला.

मालवणमध्ये मुद्दाम उद्धव ठाकरे यांची सभा घेतोय. कारण महाराजांचा पुतळा कोसळला यासाठीच आम्ही मालवणमध्ये सभा घेत आहोत. 17 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मालवण कुडाळमध्ये रॅली काढत फिरणार आहेत. आता फसलो तर कायमचे गेलो, आता नाही तर केव्हाच नाही, असेही यावेळी विनायक राऊत यांनी सांगितले.

Vinayak Raut
Kagal Assembly Election : फोडाफोडीने कागलचं गणित बिघडणार? घाटगे-मुश्रीफ यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com