Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली, म्हणाले 'चालू काय करणार...'

Eknath Shinde Uddhav Thackeray : 2004 ते 2014 काँग्रेसने राज्याला दोन लाख कोटी दिले. मोदींनी 2014 ते 2024 या वर्षात 10 लाख कोटी दिले. पाचपट निधी दिला. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतय आहे, असा टोला शिंदेंनी लगावला.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता 'बंद सम्राट' म्हणून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

शिंदे म्हणाले, बंद सम्राट मुख्यपदावर बसले होते तेव्हाही आणि आत्ताही त्यांचे भाषण पाहा ते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, धारावी बंद करू, रिफायनरी बंद करू. मी म्हणतो अरे काय चालू करणार ते तरी सांगा. बंद सम्राटाला कायमची घरा बंद करण्याची वेळ आली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
PM Modi on Marathwada : 'मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारे सरकार हवे, की पाण्याच्या थेंबाला तरसवणारे काँग्रेस आघाडीचे?' ; मोदींचा सवाल!

आम्ही दोन वर्षापूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सहभागी झालो. त्या विकासाची फळे आज मिळत आहेत. 2004 ते 2014 काँग्रेसने राज्याला दोन लाख कोटी दिले. मोदींनी 2014 ते 2024 या वर्षात 10 लाख कोटी दिले. पाचपट निधी दिला. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतय आहे, असा टोला शिंदेंनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही एक गेमचेंजर योजना आणली. लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे या महाभकास आघाडीवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाविकास आघाडी कोमात गेली आहे. म्हणून आम्ही म्हतोय केलय काम भारी आणि पुढची तयारी. काल पर्यंत हे लोक म्हणत होते की भीक देताय का? बहिणींना लाच देताय का? हे असं विचारणारांना भगीनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

यांनी पंचसुत्री योजना आणली. आमच्या योजना चोरायला लागतेत. डुप्लिकेट ते डुप्लिकेट. काॅपी करून पास होता येत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला लगावला. महाराष्ट्राचा जीडीपी दुप्पट होतोय. आम्ही शब्द देतो की जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेले आहेत ते त्यांना पुन्हा मुंबईत आणू त्यांना हक्काचे घर देऊ, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र विकास आघाडीला धारा देणार नाही. यांची मशाल क्रांतीची मशाल नाही. घरा घरात भांडण लावणारी, जातीजातीमध्ये तेढ लावणार ही मशाल आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचा पुन्हा एकदा भाजपला 'जोर का झटका'; दगाबाजी होऊनही विजय खेचून आणला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com