Ganesh Naik Janata Darbar Petition : गणेश नाईकांचा जनता दरबार; न्यायालयाचा सल्ला एकनाथ शिंदेंची शिवसेना ऐकणार का?

High Court Advice on Ganesh Naik Janata Darbar : ‘जनता दरबारा’मध्ये महापालिका आणि इतर सरकारी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
Janata Darbar legal controversy Maharashtra
Janata Darbar legal controversy MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

High Court advice to Eknath Shinde Sena: भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी ही याचिका दाखल केली होती.

‘जनता दरबारा’मध्ये महापालिका अन् इतर सरकारी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने केला. तसंच न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जनता दरबारसंदर्भात मंत्री गणेश नाईक यांच्याकडे जाऊन तो न भरवण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला. न्यायालयाच्या या सल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्री गणेश नाईक यांच्याकडे जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री गणेश नाईक ठाणे किंवा नवी मुंबईचे पालकमंत्री नाहीत, तरीही नवी मुंबईत जनता दरबार घेऊन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला दिवसभर वेठीस धरतात. तसे करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा दावा करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी जनता दरबाराविरोधात याचिका केली होती.

मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने पाटकर यांना सल्ला दिला. न्यायालयाच्या या सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे किशोर पाटकर भाजपचे (BJP) मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपस्थितीत राहून तो न भरवण्याची मागणी करणार का? असा प्रश्न केला.

Janata Darbar legal controversy Maharashtra
Nawab Malik News: नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार? मनी लॉड्रिंग प्रकरणी न्यायालयाचा मोठा दणका

तत्पूर्वी महापालिका, सिडको आणि इतर वरिष्ठ नागरी आणि सरकारी अधिकारी या दरबारामुळे दिवसभर उपस्थित राहतात. त्यामुळे नियमित कर्तव्ये बजावण्यापासून त्यांना दूर राहावे लागते आणि नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे नाईकांचा जनता दरबार थांबवण्यात यावा आणि त्यांच्या दरबारामध्ये उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा तो दिवस नियमित सुट्टी धरून त्या दिवसाचे वेतन अदा न करण्याची मागणी पाटकर यांनी केली.

Janata Darbar legal controversy Maharashtra
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दोन झटके, एक भाजपने दिला दुसरा दादांनी

किशोर पाटकर यांच्या या मागणीवर न्यायालयाने आश्यर्य व्यक्त केले. याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घ्यावी आणि स्वत: या जनता दरबारात उपस्थित राहून तो न भरवण्याची मागणी करावी, असे सुनावले. दरम्यान, याचिकाकर्ता हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असून, ही याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने वकील सुदीप नारगोळकर यांनी न्यायालयाला सांगितले आणि याचिका फेटळण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com