

Mumbai News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. मलिकांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. तेव्हापासून ते प्रकृतीचे कारण देत जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. पण आता न्यायालयानं नवाब मलिकांना (Nawab Malik) दणका दिला. ते पुन्हा तुरुंगात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई सत्र न्यायालय विशेष एमपी एमएलए कोर्टाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मोठा दणका दिला आहे. मालिकांविरोधात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झाले आहेत. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील एका महिलेची तीन एकर जमीन कट रचत बळकावल्याचा गंभीर आरोप झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टात मंगळवारी(ता.18) 3 वाजता सुनावणी पार पडली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी मलिक यांच्या वकिलाने याप्रकरणी आम्ही मुंबई हायकोर्टासमोर काही आवश्यक कागदपत्रे ईडीकडून मागितल्याचं सांगितलं.
पण आता न्यायालयाने या प्रकरणी मलिक यांना दोषी ठरवलं आहे. हा मलिकांना मोठा धक्का मानला जात आहे. आता नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणी आता 19 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी चांगल्याच वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयीन सुनावणीदरम्यान आम्ही या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केल्याचं नमूद केलं.
तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत किंवा सरकारी वकील निवेदन देईपर्यंत आरोप निश्चित करणं पुढे ढकलण्याची विनंतीही आरोपीच्या वकिलांनी केली. मात्र,कोणत्याही प्रकरणात चार आठवड्यांच्या आत आरोप निश्चित करण्याचे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिल्याचं सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.