IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप; नवी मुंबई पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

Navi Mumbai Police District Collector Office : नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकर यांनी एका प्रकरणात दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ट्रेनी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी त्यांनी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचे समोर आले आहे आहे. तसा अहवाल पोलिसांनी गृह विभागाला बुधवारीच सादर केला आहे.

गृह विभागाला नवी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या अहवालानुसार ही घटना पनवेल पोलिस स्टेशन संदर्भातील असून 18 मेला खेडकर यांनी थेट उपायुक्तांना फोन केला होता. पोलिसांनी खेडकर यांच्या एका नातेवाईकाला चोरीच्या प्रकरणात अटक केली होती.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : ऑडीत फिरणाऱ्या पूजा खेडकर आल्या ताळ्यावर; आता वाशिममध्ये ‘ही’ गाडीच ‘लयभारी’…

नातेवाईकाला सोडवण्यासाठी खेडकर यांनी नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन केला होता. त्याला सोडून देण्याची विनंती खेडकर यांनी पानसरे यांनी केली होती. संबंधित नातेवाईक निर्दोष असून त्याने केलेला गुन्हा किरकोळ असल्याचे सांगत खेडकर यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता.

आपण आयएएस अधिकारी बोलत असल्याचे खेडकर यांनी पानसरेंना सांगितले होते. पण पानसरे यांना याबाबत खात्री नसल्याने त्यांना संशय आला होता. त्यामुळे खेडकरांच्या नातेवाईकाला सोडून देण्यात आले नाही.  

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : खेडकरांचा 'मुळशी पॅटर्न', पूजाच्या आईकडून जमीन लाटण्यासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक

खेडकर यांची पुण्यातून वाशिमला बदली झाल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यानंतर नवी मुंबई पोलिस पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व गृह विभागाकडे पोहचले. गृह विभागाच्या सांगण्यावरून पानसरे घटनेबाबत अहवाल सादर केला.

दरम्यान, खेडकर यांच्याविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी दृष्टीहीन असल्याचे तसेच नान क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट दिल्याचा आरोप होत आहे. त्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना इतर सहकारी अधिकाऱ्यांची केबिन बळकावणे, कर्मचाऱ्यांसी चांगले वर्तन नसणे, गाडीवर अंबर दिवा लावणे अशा अनेक तक्रारी खेडकर यांच्याविषयी होत्या. त्याची दखल घेत राज्य सरकारने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बदली केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com