Navneet Rana News : ओवेसींची खासदारकी रद्द करा; थेट राष्ट्रपतींना नवनीत राणांनी लिहले पत्र

Bjp Political News : नवनीत राणा यांनी ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गुरुवारी 27 जून रोजी पत्र पाठवून केली.
Navneet Rana Asaduddin Owesi
Navneet Rana Asaduddin OwesiSsrkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुकीपासून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. नवनीत राणा यांनी ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गुरुवारी 27 जून रोजी पत्र पाठवून केली. त्यामुळे येत्या काळात वातावरण पुन्हा तापणार आहे.

18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owesi) यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. (Navneet Rana News )

यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केला. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी 'जय भीम, जय तेलंगणा' आणि नंतर 'जय पॅलेस्टाईन'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ केला होता.

लोकसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लागलीच जय पॅलेस्टाईनचे नारे दिले होते. पॅलेस्टाईन विषयीची त्यांची निष्ठा यातून दिसली. इतर राष्ट्राविषयीची ही कृती संविधानाचे उल्लंघन करणारी आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याची टीका माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली. त्यासोबतच राणा यांनी ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गुरुवारी 27 जून रोजी पत्र पाठवून केली.

Navneet Rana Asaduddin Owesi
MLC Election : विधान परिषदेच्या 'या' सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

देशाची अखंडता आणि ऐक्य टिकविणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. संसद सद्स्य असतानाही असदुद्दीन ओवेसी यांनी या गोष्टीचे सार्वजनिकरित्या उल्लंघन केले आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशा शब्दात राणा यांनी निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद चांगलाच चिघळला होता. लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये भाजपने (Bjp) ओवेसीविरुद्ध माधवी लता यांना मैदानात उतरवले होते. नवनीत राणा त्यांच्या प्रचारासाठी हैदराबाद येथे गेल्या होत्या. त्यावेळी पण राणा यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली होती.

Navneet Rana Asaduddin Owesi
Ajit Pawar GST : देशाच्या रिअल इस्टेटला उभारी देण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना अजितदादांची साथ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com