Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावले मागे ? तटकरेंचे सूचक ट्विट

Political News : या प्रकरणी नेतेमंडळींनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Ajit Pawar, Nawab Malik
Ajit Pawar, Nawab Maliksarkarnama
Published on
Updated on

Political News : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. यामुळे महायुतीमधील भाजपची चांगलीच अडचण झाली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असल्याने फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहीत मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते आरोप पाहता त्यांना 'महायुती'मध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे ट्विटरवरून पत्र पाठवत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावलं मागे आला आहे. दरम्यान या वरून नेतेमंडळींनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Ajit Pawar, Nawab Malik
Ahmednagar Crime News : जमावाचा शस्त्रांनी हल्ला अन् गोळीबार; नगरमधील ममदापुरात थरार...

आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देत स्पष्ट केले. दरम्यान, सुनील तटकरे यांनी केलेले ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी रिट्विट केले आहे.

“नवाब मलिक यांना आम्ही निमंत्रण देणार नाही. आम्ही आता विरोधात आहोत. तो राष्ट्रवादीशी संबंधित प्रश्न आहे. मलिक यांचा उल्लेख सभागृहमध्ये यापूर्वी देशद्रोही म्हणून केला गेला. त्यामुळे देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न असावे. महायुतीला ते सोबतही पाहिजे आणि जवळही नको. भाजप हुशार पक्ष आहे, ते याच्यातून मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

“नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादीचे नाहीत, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. आमच्याकडून नवाब मलिकांचा (Nawab Malik ) सन्मान होईल. ते माझ्यासाठी आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने असते. भुजबळ अडचणीत असताना जेलमध्ये गेले होते. अजित पवार गट वेगळा झाला आहे तर ते असे वागवत असतील तर योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्ष शरद पवार आहेत”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Ajit Pawar, Nawab Malik
Nawab Malik : जामिनावर बाहेर आल्यानंतर मलिक पहिल्यांदाच अधिवेशनाला; पण बसणार कोणत्या बाकावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com