Nawab Malik : जामिनावर बाहेर आल्यानंतर मलिक पहिल्यांदाच अधिवेशनाला; पण बसणार कोणत्या बाकावर?

Nagpur Assembly Session : शरद पवार, अजित पवार गटाकडून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न....
Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय जमिनावर बाहेर आलेले नवाब मलिक यांच्या बाबतीत नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कमालीची उत्सुकता लागली आहे. नवाब मलिक हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता. 7) विधिमंडळाच्या पायऱ्या चढणार आहेत.

विधानसभेत आल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) नेमके कोणत्या बाकांवर बसतात याबद्दल सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीतील दोन्हीही गट नवाब मलिक आपल्या गटात बसावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

Nawab Malik
Thackeray Group vs Shinde Gat : EVM वादावरून दोन संजय भिडले; गायकवाडांनी राऊतांची अक्कलच काढली

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मलिक तब्बल 1 वर्ष 5 महिन्यानंतर जेलबाहेर आले आहेत. मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला. तेव्हापासून मुलीचे वैद्यकीय उपचार घेत आहेत.(NCP)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर आता ते नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. विधिमंडळात मध्ये पाय ठेवताच मलिक सर्वात प्रथम कोणाची भेट घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत. मलिक यांनी अद्याप ते शरद पवारांसोबत आहेत की अजित पवारांसोबत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे विधिमंडळातील त्यांची उपस्थिती ते कोणासोबत आहेत, हे स्पष्ट करणार आहे. (Winter Session)

मलिक यांच्याबाबत ते महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना भाजपने सर्वाधिक आक्रमक भूमिका घेतली होती. आता भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट सत्तेवर आहे. अजित पवार हे देखील सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. अशात मलिक त्यांना विरोध करणाऱ्या भाजपसोबत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात जातात की शरद पवारांच्या गटात याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळातीत सर्वांनाच लागली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Nawab Malik
Revanth Reddy: रेवंथ रेड्डीजी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही पेटून उठायला शिकवा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com