NCP Politics : अजितदादांचा धनंजय मुंडेंना धक्का, दिल्लीच्या निवडणुकीसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

Excludes Dhananjay Munde from Star Campaigners List : दिल्ली विधानसभेची निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार असून निकाल आठ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
Dhananjay Munde, Ajit Pawar
Dhananjay Munde, Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीच्या यशाने आत्मविश्वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार असून निकाल आठ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्यामुळे पक्षांकडून स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत धनंजय मुंडे यांना नेहमीच स्थान असते मात्र या वेळी त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे.

Dhananjay Munde, Ajit Pawar
Andhra Pradesh Government : निवडणूक लढवायची? तर मग तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं हवीत ; आंध्रप्रदेशात लागू होणार अजब नियम!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे मुंडे यांना स्टार प्रचाराकांच्या यादीतून वगळ्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. स्टार प्रचाराकांच्या यादीत अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचा देखील समावेश आहे.

छगन भुजबळ यांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मानले जात होते. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळ यांना देखील स्थान मिळालेले नाही.

आप विरुद्ध भाजप थेट लढत

राष्ट्रवादी काँग्रेसने आपली 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. काँग्रेस देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. मात्र, काँग्रेसने जास्त मते घेतल्यास त्याचा थेट फटका आपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dhananjay Munde, Ajit Pawar
Saif Ali Khan Attack Updates Video : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने केली एक कोटीची मागणी, धक्कादायक माहिती समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com