Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण

Dhananjay Munde News Update : वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, कराड आणि करुणा शर्मा यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात अडकलेला आहे.
Dhananjay Munde News Update
Dhananjay Munde News UpdateSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी पऱळी कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी उमेदवारी अर्जात खरी माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडे यांनी याबाबत परळी कोर्टात ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारी दखल घेत कोर्टानं धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंडे आज कोर्टात हजर राहिले नाहीत तर अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, असे करुणा यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले आहे. परळीच्या फौजदारी कोर्टात याबाबतची सुनावणी होणार आहे. परळी कोर्ट काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता आहे.

Dhananjay Munde News Update
Anant Bhave Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक, वृत्तनिवेदक अनंत भावे यांचे निधन

मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, कराड आणि करुणा शर्मा यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात अडकलेला आहे.

काय आहे प्रकरण

नुकत्याच झालेली परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा शर्मा यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. पण यात दुसरी पत्नी करुणा शर्मा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेख केलेला नाही. त्यांनी ही माहिती दडपल्याबाबत शर्मा यांनी परळी फौजदारी न्यायालयात तक्रार केली आहे. या ऑनलाइन तक्रारीचे कागदपत्रे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोर्टात दाखल करण्यात आली. त्यानंतर कोर्टानं मुंडे यांना नोटीस बजावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com